For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाहिदसोबत दिसणार जान्हवी

06:58 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
शाहिदसोबत दिसणार जान्हवी
Advertisement

साय-फाय चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये भूमिका

Advertisement

शाहिद कपूर आणि क्रीति सेनॉन ही जोडी लवकरच ‘कॉकटेल 2“ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत आहे. परंतु शाहिद कपूरच्या आणखी एका चित्रपटाचा सीक्वेल येत असून त्याच्यासोबत यात जान्हवी कपूर ही अभिनेत्री दिसून येणार आहे.

शाहिद कपूर लवकरच स्वत:चा साय-फाय रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया“चा सीक्वेल घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रेम आणि तंत्रज्ञानाच्या अनोख्या मिश्रणाला प्रेक्षकांनी पसंत केले होते. आता निर्माते या फ्रेंचाइजीला आणखी मोठ्या स्तरावर निर्माण करणार आहेत.

Advertisement

शाहिद अन् क्रीति मुख्य भूमिकेत आहे, याचबरोबर या फ्रेंचाइजीत आता जान्हवी कपूरही जोडली जाणार आहे. या चित्रपटाची कहाणी सध्या लिहिली जात आहे. निर्माते पुढील वर्षी याचे चित्रिकरण सुरू करणार आहेत. शाहिद याचबरोबर ‘फर्जी 2“ सीरिजमध्ये काम करत आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

Advertisement
Tags :

.