For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार जान्हवी

07:00 AM Jul 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार जान्हवी
Advertisement

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील उदयोन्मुख अभिनेत्रीपैकी एक आहे. जान्हवीने बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटविला आहे. अलिकडेच ती राम चरणची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘पेड्डी’मध्ये दिसून आली आहे. याचदरम्यान जान्हवी आता एका भयपटात  काम करत असल्याचे समोर आले आहे. जान्हवीने स्वत:च्या पुढील प्रोजेक्ट्ससाठी कहाण्या ऐकण्यास सुरुवात केली अहो. 2021 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘रुही’नंतर जान्हवी पुन्हा भयपटाकडे वळली आहे. हा एक क्रीचर (प्राणी) हॉरर असेल, ज्यात घाबरविण्यासाठी एक नव्या प्रकारचा प्राणी कहाणीत सामील असेल. 2014 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘क्रीचर’ देखील काहीसा असाच चित्रपट होता. नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे करणार आहे. त्यांना तुंबाड चित्रपटासाठी ओळखले जाते. जान्हवीचा हा चित्रपट जियो स्टुडिओजकडून निर्माण केला जाणार आहे. जान्हवीला या चित्रपटाची कहाणी पसंत पडली आहे. याचे चित्रिकरण चालू वर्षीच सुरू केले जाणार आहे. जान्हवी आगामी काळात आणखी एका दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत दिसून येणार आहे. अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘राका‘मध्ये ती दीपिका पदूकोनसोबत काम करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.