कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जान्हवी लाड हिचे एम.बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश

03:40 PM Apr 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Oplus_131072
Advertisement

कट्टा / वार्ताहर 

Advertisement

मालवण तालुक्यातील पराड येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू लाड व बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या कार्यवाह, खरारे पेंडूर गावच्या ग्रा.पं. सदस्या वैष्णवी लाड यांची कन्या कु. जान्हवी विष्णू लाड हिने एम. बी. बी. एस परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.कु. जान्हवी ही अभ्यासात अत्यंत हुशार मुलगी असून इयत्ता ४ थी स्कॉलरशीप व ७ वी स्कॉलरशीप परीक्षेत ती गुणवत्ता यादीत आली होती. तर ओरोस येथील डॉन बॉस्को इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शिक्षण घेताना दहावी एस.एस.सी परीक्षेत तिने १०० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. तसेच नीट या परीक्षेतही तिचा यशाचा आलेख चढताच राहिला. ६६७ गुण मिळवत तिला KEM मेडिकल कॉलेज मुंबईला प्रवेश मिळाला. मेडिकलच्या प्रत्येक वर्षी ती विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण होत होती. अन अखेर ७४ टक्के गुण मिळवून विशेष गुणवत्तेसह ती डॉक्टर झाली.तिच्या यशात वडील विष्णू, आई वैष्णवी, भाऊ सोहम यांचा निश्चितच वाटा आहे. तिच्या या यशाबाबत तिचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बॅ. नाथ पै सेवांगण, संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun Bharat sindhudurg # news update # konkan update # janhavi lad # marathi news
Next Article