राम चरणच्या "आरसी १६" चित्रपटाच्या सेटवरून बर्थडे गर्ल जान्हवी कपूर!
मुंबई
अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज (दि. ६ ) रोजी वाढदिवस असतो. अभिनेता राम चरणच्या "आरसी १६" या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेट जान्हवीचा वाढदिवस साजरा केला. निर्मात्यांनी या सेटवरून जान्हवीचा एक फोटो सोशल मिडीयावर चाहत्यांशी शेअर केला.
हा फोटो म्हैसूर शेड्यूलमधील सेटवर क्लिक करण्यात आला होता. जिथे अभिनेत्री राम चरणसोबत शूटिंगमध्ये सहभागी झाली होती. तथापि, हा जान्हवी कपूरचा फोटो 'आरसी १६' या चित्रपटाच्या सेटवरच आहे, अशी खात्री नाही आहे. पण या सिनेमाच्या निर्मात्यांनी हा फोटो बीटीएस म्हणून शेअर केला आहे.
जान्हवी कपूरने ज्युनियर एनटीआर सोबत 'देवरा: पार्ट १' या तेलुगू चित्रपटातून पदार्पण दाक्षिणात्य सिनेक्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यानंतर, जान्हवी तिच्या दुसऱ्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. राम चरण यांच्या आगामी 'आरसी १६' (तात्पुरते शीर्षक) या चित्रपटात तिला कास्ट करण्यात आले आहे. गुरुवारी (६ मार्च) तिच्या वाढदिवसानिमित्त, आरसी १६ चित्रपट निर्मात्यांनी जान्हवीला नवीन पोस्टरद्वारे शुभेच्छा दिल्या.