गुनीत मोंगाच्या चित्रपटात जान्हवी
जान्हवी कपूर ही ‘पेद्दी’च्या वादातून सावरली असल्याचे मानले जात आहे. अभिनेत्रीने दिग्दर्शक उमेश बिष्ट यांच्या चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. जान्हवीच्या नव्या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. हा चित्रपट एकता कपूर यांचे बालाजी मोशन पिक्चर्स आणि गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेनमेंटकडून निर्माण केला जाणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास सुरू होणार आहे. कहाणी अन् उर्वरित कलाकारांसंबंधी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. उमेश बिष्ट सध्या ‘पगलैट 2’च्या दिग्दर्शनात व्यग्र आहेत. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित नेटफ्लिक्स चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. सान्या मल्होत्रा यात संध्याच्या रुपात स्वत:ची मुख्य भूमिका साकारणार आहे. पेद्दी चित्रपटातील जान्हवीच्या भूमिकेमुळे चित्रपटांमध्sय महिलाहंच्या सादरीकरणावरून एक चर्चा सुरू झाली होती. चित्रपटाचा कॅमेरा अँगल, क्लोज-अप शॉर्ट्स आणि रोमँटिक दृश्यांवर लोकांकडून टीका करण्यात आली होती. निर्मात्यांनी अभिनेत्रीच्या पात्राला एक सार्थक भूमिका देण्याऐवजी तिला एका दृश्य वस्तूत बदलल्याचा आरोप लोकांनी केला होता. याप्रकरणी दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी माफी मागत चित्रपटातील वादग्रस्त दृश्यं हटविली होती.