महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महाभारतावर आधारित चित्रपटात जान्हवी

06:34 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा चित्रपट

Advertisement

अखिल भारतीय स्तरावरील चित्रपट निर्माण करण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. याचनुसार राकेश ओम प्रकाश मेहरा हे कर्ण हा चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट हिंदू पौराणिक ग्रंथ महाभारतातील कर्ण या पात्रावर आधारित असल्यचे समजते.

Advertisement

या चित्रपटाचे बजेट अत्यंत मोठे असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात कर्णाची भूमिका साकारण्यासाठी तमिळ चित्रपटसृष्टीतील स्टार सूर्याची निवड करण्यात आली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरची नायिका म्हणून निवड करण्यात आल्याचे समजते. यासंबंधी अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. हा चित्रपट दोन हिस्स्यांमध्ये निर्माण करण्याची योजना आहे. सध्या या चित्रपटाची निर्मितीपूर्व काम सुरू आहे.

जान्हवी सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिकांना प्राथमिकता देत आहे. जान्हवी पहिल्यांदाच एखाद्या पौराणिक चित्रपटात दिसून येणार आहे. जान्हवीने यापूर्वीच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्युनियर एनटीआरसोबत ती देवरा या चित्रपटात काम करत आहे. याच्या माध्यमातून ती तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट चालू वर्षी प्रदर्शित केला जाणार आहे. याचबरोबर जान्हवीचे दोन चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही तसेच उलझ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article