‘जंगम’ बेपत्ता तपास अपर पोलीस अधीक्षकांकडे
रत्नागिरी :
तालुक्यातील वाटद खंडाळा येथील खून प्रकरणात मृत राकेश जंगम हा एक वर्षापासून बेपत्ता होत़ा या प्रकरणी मागील वर्षभरात जयगड पोलिसांकडून नेमका कशा प्रकारे तपास करण्यात आला, त्यामध्ये काय आढळून आले, या संबंधीचा तपास अपर पोलीस अधीक्षक ब़ी ब़ी महामुनी यांच्याकडे सोपवला आह़े महामुनींच्या अहवालात जयगड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा अधीक्षक बगाटे यांनी दिला आह़े
रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात मुख्य संशयित दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याची कबुली दिल्याने रत्नागिरी जिल्हा पुरता हादऊन गेल़ा वर्षभरापूर्वी घडलेले खून आता उघड झाल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आह़े या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बगाटे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील मंथन सभागृहात पत्रकार परिषद घेतल़ी यावेळी बगाटे यांनी दुर्वास पाटील यांने केलेल्या तीन खूनांबाबत व अटक करण्यात आलेल्या आरोपींबाबत माहिती दिल़ी
दुर्वास याने वाटद खंडाळा येथील राकेश जंगम याचा 6 जून 2024 रोजी खून करून मृतदेह आंबा घाटात फेकून दिल्याचे पोलिसांजवळ उघड केले होत़े दरम्यान राकेश याच्या आईने 21 जून 2024 रोजी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार जयगड पोलिसात दाखल केल़ी तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्याकडे सखोल तपासाची मागणी केली होत़ी मात्र जयगड पोलिसांना राकेश याचा कोणताही थांगपत्ता लागला नाह़ी अखेर भक्ती मयेकर हिच्या खूनाचा तपास करताना दुर्वास याने राकेश जंगम याचाही खून केल्याचे समोर आल़े यामुळे वर्षभरात जयगड पोलिसांकडून नेमका कशा प्रकारे तपास करण्यात आला, याची माहिती मागविण्यात आल्याचे बगाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल़े
- पोलिसांच्या सखोल तपासामुळेच खूनांचा उलगडा
जयगड पोलिसांत एक वर्षापूर्वी राकेश जंगम बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होत़ी त्यासंबंधी योग्य दिशेने पोलिसांनी योग्य दिशेने तपास केला नाही का, असा प्रश्न बगाटे यांना विचारला असता पोलीस अधीक्षक बगाटे यांनी सांगितले की, तीन खूनांचा छडा पोलिसांनीच लावला आह़े पोलीस समाजासाठी काम करत असून त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नय़े तपासकामात कोणी दोषी आढळल्यास नक्कीच कारवाई केली जाईल़
- बेपत्ता प्रकरणांचा छडा लावण्यासाठी मिसिंग सेल
जिह्याच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल बेपत्ता नागरिकांची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे येत असून त्यांच्याकडे मिसिंग सेल तयार करण्यात आला आह़े रत्नागिरी जिल्हा बेपत्ता इसमांना शोधण्यात राज्यात सगळ्dयात पुढे आह़े असे असले तरी गांभीर्याने अशा प्रकरणांकडे पहावे व वेळ पडल्यास घरी जावून अशा व्यक्तींचा शोध घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे बगाटे यांनी सांगितल़े
- नीलेश भिंगार्डे काजू बीच्या व्यवसायासाठी रत्नागिरीत
राकेश जंगम याच्या खूनातील तिसरा आरोपी नीलेश जंगम हा मूळचा सांगली येथील रहिवासी आह़े असे असताना त्याचा रत्नागिरीशी व संशयित दुर्वास याच्याशी कसा संबंध आला, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होत़े याविषयी बोलताना बगाटे यांनी सांगितले की, नीलेश हा काजू बीचा व्यवसाय करत होत़ा त्यासाठी तो उन्हाळ्याचे चार महिने खंडाळा येथे येत अस़े तसेच त्याला दाऊचे व्यसन असल्याने दुर्वास पाटील याच्या सायली बारमध्ये तो दाऊ पिण्यासाठी जात होत़ा याच ठिकाणी त्याची दुर्वास याच्यासोबत ओळख झाली होती, अशी माहिती बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिल़ी
- सीताराम, भक्ती मयेकर यांचे सीडीआर मागवले
मारहाणीत खून करण्यात आलेला सीताराम वीर हा दुर्वास याची प्रेयसी भक्ती मयेकर हिला अश्लिल मेसेज करत होत़ा याच रागातून त्याचा खून केल्याची कबुली दुर्वास याने पोलिसांजवळ दिली आह़े सीताराम व भक्ती या दोघांचाही खून करण्यात आल्याने याबाबतची नेमकी सत्यता समजू शकलेली नाह़ी यासाठी दोघांचेही कॉल डिटेल्स व संदेश तपासण्यासाठी मोबाईलचे सीडीआर मागवण्यात आल्याचे बगाटे यांनी सांगितल़े
- राकेशच्या मृतदेहाबाबत कोणताही सुगावा नाही
दुर्वास याने राकेश याचा 6 जून 2024 रोजी खून करून तो आंबा घाटात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितल़े यानंतर पोलिसांनी संपूर्ण आंबा घाटात शोधमोहीम हाती घेतली होत़ी खूनाच्या घटनेला आता 1 वर्ष उलटून गेले असून आंबा घाट परिसरात दाट जंगल आह़े आतापर्यंत पोलिसांच्या शोधकार्यात राकेशच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले नसल्याचे बगाटे यांनी सांगितल़े
- बार बंद करण्याचे अधिकार आम्हांला नाहीत
भक्ती मयेकर व सीताराम वीर यांच्या खूनाची घटना खंडाळा बाजारपेठ येथील सायली बारमध्ये करण्यात आली होत़ी एवढ्या गंभीर घटना घडल्या असतानाही हा बार अजूनही चालू कसा, असा प्रश्न बगाटे यांना विचारला असता बार बंद करण्याचा अधिकार पोलिसांना नाह़ी तपासकामात जे आवश्यक आहे ते पोलिसांकडून केले जाईल, असे बगाटे यांनी सांगितल़े