For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shahuwadi Election Result | शाहूवाडीत जनसुराज्य शक्ती पक्षाची दमदार मुसंडी

05:54 PM Feb 09, 2026 IST | NEETA POTDAR
shahuwadi election result   शाहूवाडीत जनसुराज्य शक्ती पक्षाची दमदार मुसंडी
Advertisement

                                शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचा प्रभाव वाढला

Advertisement

शाहूवाडी :  शाहुवाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत जनसुराज्य शक्ती पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आहे .दोन जिल्हा परिषद मतदार संघ व चार पंचायत समिती मतदारसंघ जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे .तर शिवसेना उबाठा गट व अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्या आघाडीने देखील दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागा जिंकून आपले अस्तित्व देखील टिकवून ठेवले आहे.

शाहूवाडी तालुक्यात पक्षीय बंधनापेक्षा गटाच्या निवडणुका अधिक होत असतात .यामुळे आमदार विनय कोरे व गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड   ,  सर्जेराव पाटील पेरीडकर यांच्या   विरोधात माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर , उदय साखर चे चेअरमन मानसिंग गायकवाड, जिल्हा बँकेत संचालक रणवीरसिंह गायकवाड यांच्यातच लढत झाली होती. 
   

Advertisement

यावेळच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने चांगलीच मुसंडी घेतली आहे .गत वेळेपेक्षा एक जिल्हा परिषद मतदारसंघ खेचून आणला. तर चार पंचायत समितीच्या जागा जिंकल्या यामुळे तालुक्याच्या राजकारणात जनसुराज्यने देखील आपले आवाहन निर्माण केले आहे. तर विरोधी माजी आमदार सत्यजित पाटील व रणवीर सिंग गायकवाड मानसिंग गायकवाड यांच्या आघाडीने देखील आपले बालेकिल्ले  सांभाळत दोन जिल्हा परिषद चार पंचायत समिती राखल्या.

आता पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेला यामुळे नेमकं काय होणार याची चर्चा रंगू लागली आहे .कारण सभापती पद सर्वसाधारण गटासाठी राखीव झाली आहे व दोन्ही गटाकडे सभापती पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.

विजयी उमेदवारांची नावे -

शित्तुर पंचायत समिती विजयी - प्रियंका तानाजी भोसले

 येलुर पंचायत समिती विजयी -  अमर नारायण खोत

सरूड पंचायत समिती विजयी  -धनश्री जयवंत पाटील

भेडसगाव पंचायत समिती विजयी - माधुरी दिलीप पाटील

    आंबर्डे पंचायत समिती विजयी - राजेश पांडुरंग पाटील

   येळवण जुगाई पंचायत समिती विजयी  - सुरेश यशवंत पवार

 बांबवडे पंचायत समिती विजयी - अभयसिंह बाळासाहेब चौगुले

   पिशवी पंचायत समिती विजयी - लक्ष्मी बाबुराव पाटील

 

Advertisement
Tags :

.