For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनधन योजनेला 10 वर्षे पूर्ण

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनधन योजनेला 10 वर्षे पूर्ण
Advertisement

योजनेच्या अंतर्गत 53.13 कोटी जनधन खाती

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी जन धन योजना यशस्वी ठरण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व लोकांचे कौतुक केले आहे. ही योजना वित्तीय समावेशकतेला चालना देण्यात महत्त्वपूर्ण राहिली असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत. जनधन योजनेला बुधवारी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. जनधनला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मी सर्व लाभार्थींना शुभेच्छा देतो. या योजनेला यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानतो. जनधन योजना कोट्यावधी देशवासीय, विशेषकरून आमच्या गरीब बंधूभगिनींना आर्थिक स्वरुपात सशक्त करणे आणि त्यांना सन्मानासोबत जीवन जगण्याची संधी देण्यात यशस्वी ठरली असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे.

Advertisement

जनधन योजना वित्तीय समावेशकतेला चालना देणे आणि कोट्यावधी लोक, विशेषकरून महिला, युवा आणि वंचित समुदायांना सन्मान देण्याकरता मोलाची ठरली असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान जन धन योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक परिवारासाठी बँकिंग खाते, वित्तीय साक्षरता, कर्ज, विमा आणि पेन्शन सुविधा तसेच बँकिंग सुविधा  पोहोचविण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. देशात सध्या 53.13 कोटी जनधन खाती आहेत. या खात्यांमध्ये सुमारे 2.3 ट्रिलियन रुपये जमा आहेत. यातील सुमारे 80 टक्के खाती सक्रीय आहेत. पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गतच 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार पैसे जमा करत असते.

Advertisement
Tags :

.