सरकारविरोधात आजपासून जन आक्रोश यात्रा
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजप आजपासून जन आक्रोश यात्रा काढणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली. बेंगळूर येथील भाजप कार्यालयात आयोजित पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोमवारपासून आम्ही राज्यातील भ्रष्ट काँग्रेस सरकारच्या विरोधात जन आक्रोश यात्रा सुरू करणार आहोत. सोमवारी म्हैसूरमध्ये चामुंडेश्वरी देवीची पूजा केल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी जन आक्रोश यात्रेचा शुभारंभ करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विजयेंद्र पुढे म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात आम्ही ही जन आक्रोश यात्रा काढत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये ही जन आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. जेव्हा भाजप राज्य सरकारच्या विरोधात लढायला सुऊवात करतो. तेव्हा काँग्रेसला कोविडसारखे अहवाल आठवतात. सरकारच्या धमक्मयांना आम्ही घाबरणार नाही. मुख्यमंत्र्यांची खुर्ची डळमळीत झाली की काँग्रेसला पक्षांतर्गत आरक्षणाचा मुद्दा लक्षात येतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
सत्तेत असल्याने काँग्रेस नेते मनाला येईल तसे बोलत आहेत. ते लोकविरोधी काम करत आहे. भाजप कार्यकर्ते विनय सोमण्णा प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. ही आत्महत्या नसून हत्या आहे. याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहे. भाजप कार्यकर्ते विनय सोमण्णा प्रकरणी आमदाराविऊद्ध एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणामागे कोणकोणत्या दुष्ट शक्तींचा हात आहे हे माहित आहे. प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. आम्ही कायदेशीर लढा देऊ, असे विजयेद्र यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी बोलताना, आज भाजपचा स्थापना दिवस असून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. यांचा न•ा यांच्या इच्छेनुसार आम्ही पक्ष संघटनेला पूरक असे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत, असेही विजयेंद्र म्हणाले.