जमशेदपूर संघाची आसामवर मात
वृत्तसंस्था/कोलकाता
ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत ब गटातील झालेल्या सामन्यात माजी विजेत्या मोहमेडन स्पोर्टिंगने इंटर काशी एफसी संघाला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. तर या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात जमशेदपूर एफसीने आसाम रायफल्स संघाचा पराभव केला.
मोहमेडन स्पोर्टिंग आणि या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणारा काशी एफसी यांच्यातील ब गटातील हा सामना रंगतदार झाला. सामन्याच्या पूर्वार्धात सर्बियन फुटबॉलपटू निकोला स्टोजेनोव्हीकने इंटर काशीचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत इंटरकाशी संघाने मोहमेडनवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच उत्तराधार्त अॅस्ले अल्बेन कोलीने मोहमेडन स्पोर्टिंगला बरोबरी साधून दिली.
ड गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात जमशेदपूर एफसीने आसाम रायफल्स संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत पूर्ण गुण वसुल केले. सामन्यात जमशेदपूर संघातील सेनानने 2 गोल तर खानने 1 गोल नोंदविला. जमशेदपूर संघाचा या स्पर्धेतील पुढील सामना चेन्नईन एफसी संघाबरोबर जमशेदपूरमध्ये 4 ऑगस्टला होणार आहे.