कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

10 ऑक्टोबरला झळकणार ‘जमनापार 2’

06:16 AM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेझॉन एमएक्स प्लेयरने स्वत:ची ओरिजिनल वेबसीरिज ‘जमनापार सीझन2’चा ट्रेलर सादर केला आहे. ऋत्विक साहोरे पुन्हा एकदा शैंकी बंसलच्या व्यक्तिरेखेत एका नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसून येईल. हा शो पूर्व दिल्लीच्या जमनापारच्या मजेशीर परंतु अवघड जगताला समोर आणतो, जेथे स्वप्नांची अनेकदा किंमत मोजावी लागते.

Advertisement

जमनापारच्या नव्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत ऋत्विक साहोरे, वरुण बडोला, अंकिता सहगल, सृष्टी गांगुली रिंदानी, अनुभा फतेहपुरिया, ध्रूव सहगल, इंदर साहनी दिसून येणार आहेत. जमनापार सीझन 2 ला डॉड एंड आणि बोटद्वारे सादर करण्यात आले आहे. हा शो 10 ऑक्टोबरपासून मोफत स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. स्वत:चे चार्टर्ड अकौंटंट लायसन्स गमाविल्यावर ऋत्विक पुन्हा स्वत:चे जीवन सावरण्यासाठी तयार आहे. परंतु संघर्ष देखील असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. नोकरी सोडून वडिलांच्या छोट्याशा कोचिंगमध्ये प्रामाणिकपणे तो काम करू लागतो, परंतु एका दुर्घटनेने सर्वकाही बदलुन जाते. यावेळी वडिलांसमोर स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान असते. याचबरोबर राजकारण आणि कटकारस्थानं देखील आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article