महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू-काश्मीर मतदान : दुसरा टप्पा आज

06:33 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या द्वितीय टप्प्याचे मतदान आज बुधवारी होत आहे. हे मतदान काश्मीर खोरे आणि जम्मू अशा दोन भागांमधील एकंदर 26 मतदारसंघांमध्ये होत आहे. या 26 जागांपैकी 11 जागा जम्मू भागातील असून 15 जागा मध्यकाश्मीरमधील आहेत. उमेदवारांची एकंदर संख्या 239 असून मतदारांची एकंदर संख्या 25 लाख 78 हजार इतकी आहे.

Advertisement

या 26 मतदारसंघांमधील उमेदवारांमध्ये पुरुषांची संख्या 233 तर महिलांची संख्या 6 इतकी आहे. या टप्प्यातील 131 उमेदवार कोट्याधीश असून 49 उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरुपाची प्रकरणे सादर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या जम्मू-काश्मीर शाखेचे अध्यक्ष रविंदर रैना हे सर्वात कमी उत्पन्नाचे उमेदवार असून त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती केवळ 1 हजार रुपयांची आहे.

ओमर अब्दुल्ला दुसऱ्या स्थानी

प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे गांदरबाल आणि बीववाह अशा दोन मतदारसंघातून भाग्य आजमावत आहेत. तर लोकसभा निवडणुकीत ओमर अब्दुल्लांचा पराभव केलेले इंजिनिअर रशीद हे गांदरबाल मतदारसंघात त्यांच्या विरोधात पुन्हा उभे आहेत. आणखी एक उमेदवार सरजन अहमद हे याच मतदारसंघात मैदानात असून ते कारागृहातून निवडणूक लढवत आहेत.

प्रथम टप्प्यात मोठे मतदान

जम्मू-काश्मीर मतदानाच्या प्रथम टप्प्यात 24 मतदारसंघांमध्ये मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी 61.38 टक्के होती. किश्तवाडमध्ये सर्वात अधिक 80.20 टक्के तर पुलवामा येथे सर्वात कमी 46.99 टक्के मतदान झाले होते. द्वितीय टप्प्यात श्रीनगर जिल्ह्यातील 8 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर गांदरबाल जिल्ह्यात 2 मतदारसंघात मतदान होत आहे. हब्बाकदल मतदारसंघात सर्वाधिक 16 उमेदवार मैदानात आहेत. राजौरी जिल्ह्यातील बुद्धल मतदारसंघात सर्वात कमी चार उमेदवार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

कोणत्या पक्षांचे उमेदवार किती

पीपल्स डेमॉव्रेटिक पक्ष (पीडीपी) सर्व 26 जागा लढवित आहे. तर युती केलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने अनुक्रमे 20 आणि 6 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय जनता पक्ष 17 जागांवर लढत असून 98 अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. या टप्प्यात श्रीनगर जिल्ह्यात 93, बडगाम जिल्ह्यात 46, राजौरी जिल्ह्यात 34, पूंछ जिल्ह्यात 25, गांदरबाल जिल्ह्यात 21 तर रियासी जिल्ह्यात 20 उमेदवार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article