जेम्स व्हिन्सेचे जलद शतक
वृत्तसंस्था/ कराची
येथे सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीग टी-20 स्पर्धेतील सामन्यात कराची किंग्ज संघाकडून खेळणारा आघाडीचा फलंदाज जेम्स व्हिन्सेने जलद शतक नोंदविले. पाक सुपर लीग स्पर्धेच्या इतिहासात जलद शतक नोंदविणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
कराची किंग्ज आणि मुल्तान सुल्तान या दोन संघांमध्ये हा सामना खेळविला गेला. कराची किंग्जच्या व्हिन्सेने केवळ 42 चेंडूत शतक झळकाविले. या शतकामुळे कराची किंग्जने मुल्तान सुल्तानला विजयासाठी 235 धावांचे आव्हान दिले. पण मुल्तान सुल्तानला हे आव्हान पेलवले नाही. त्यामुळे कराची किंग्जने हा सामना आरामात जिंकला. पाक सुपर लीग टी-20 स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी उस्मान खानने 36 चेंडूत शतक झळकाविले होते. तर त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या रॉसोने 41 चेंडूत शतक नोंदविले होते. जलद शतक नोंदविणाऱ्या फलंदाजांमध्ये आता व्हिन्से तिसऱ्या स्थानावर आहे.