For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेस्ट कपल स्पर्धेचे मानकरी ठरले जांभोरे दाम्पत्य !

04:29 PM Jan 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
बेस्ट कपल स्पर्धेचे मानकरी ठरले जांभोरे दाम्पत्य
Advertisement

सावंतवाडी मिनी महोत्सवात बेस्ट कपल स्पर्धा संपन्न

Advertisement

सावंतवाडी -

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि ना.दीपक केसकर मित्रमंडळ आयोजित नववर्ष स्वागत कार्यक्रम दिनांक १ जानेवारी रोजी संपन्न झाला . यात बेस्ट कपल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत बेस्ट कपल होण्याचा मान महेश - स्नेहल जांभोरे जोडीला मिळाला ."आवाज आर्ट इव्हेंट प्रस्तुत बेधुंद २०२४ हा महाराष्ट्र आणि गोव्यातील नामांकित कलाकारांचा लाईव्ह म्युझिकल गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. याच दरम्यान सावंतवाडी मध्ये प्रथमच बेस्ट कपल स्पर्धा तुफान रंगली. या स्पर्धेत बेस्ट कपल होण्याचा मान महेश - स्नेहल जांभोरे जोडीला मिळाला . त्यांना प्रथम पारितोषिक बक्षीस म्हणून जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तर्फे सोन्याची नथ आणि सन्मानचिन्ह,मेडल , प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.तर संकेत- पूजा सावंत दुसऱ्या क्रमांकाचे बेस्ट कपल ठरले . तर वडोकर दाम्पत्याने तृतीय क्रमांक पटकावला . ..ह्या स्पर्धेतील सर्वांत वयस्कर सडेकर दांपत्याने सर्वांचीच मन जिंकून घेत प्रेमाला वय नसतं हे दाखवून दिलं. ह्या स्पर्धेतील द्वितीय ,तृतीय क्रमांक विजेत्यांना चांदीच्या भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देण्यात आले . ह्या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी आणि पत्रकार श्री प्रवीण मांजरेकर आणि अभिनेता ,निवेदक श्री निलेश गुरव यांनी केली.स्पर्धेदरम्यान निवेदक राहुल कदम आणि शुभम धुरी यांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली तसेच दरम्यान सुरू असलेल्या बेधुंद गीतांच्या मैफिलीला ही रसिकांची पसंती मिळाली यात गोवा महाराष्ट्रातील गायक स्नेहल गुरव, प्रहर्ष नाईक,विठ्ठल केळुसकर,विधिता केंकरे यांनी आपल्या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व शरद पेडणेकर यांनी घेतली होती. सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील, खजिनदार रवी जाधव, सदस्य शरद पेडणेकर, शामराव हळदणकर, हेलन निबरे, प्रसाद कोदे, अशोक पेडणेकर, सुजय सावंत, शेखर सुभेदार,रूपा मुद्राळे या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता .तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल कदम तसेच सर्वच सामजिक बांधिलकीचे आणि दीपकभाई केसरकर मित्रमंडळ कार्यकर्ते आणि पत्रकार मित्र यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले माजी नगराध्यक्ष अनारीजिन लोबो ,माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष बाबू कुडतरकर त्याचप्रमाणे दीपकभाई मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, नंदू गावडे तसेच माजी नगरसेविका व पदाधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :

.