जमैकाचा मिश्र रिलेत विश्वविक्रम
वृत्तसंस्था, बोत्स्वाना (दक्षिण आफ्रिका)
येथे सुरु झालेल्या 2026 च्या विश्व अॅथलेटिक्स रिले गॅबरोनमध्ये जमैकाच्या धावपटूंनी 4×100 मिश्र रिलेमध्ये नवा विश्वविक्रम केला.
4×100 मिश्र रिलेच्या प्रकारात जमैकाचे प्रतिनिधीत्व करणारे अकिम ब्लेक, टिना क्लेटन, काड्रीयन गोल्डसन आणि टिया क्लेटन यांनी तिसऱ्या पात्र फेरीमध्ये 39.99 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम केला. याच दिवशी कॅनडाच्या एलीझर अदजिबी, मेरी इलॉइस लेक्लेअर, दुआन असेमोटा व ऑड्रे लेडुक यांनी पहिल्या हीटमध्ये नोंदवलेला विक्रम जमैकन धावपटूंनी मागे टाकला. 2025 मध्ये ग्वांगझू येथे झालेल्या विश्व रिलेमध्ये कॅनडाने 40.30 सेकंदाचा विश्वविक्रम नोंदविला होता. जर्मनी, नेदरलँड्स व नायजेरिया यांच्या धावपटूंनीही येथे मागे टाकला. जमैकन धावपटूंनी 2027 मध्ये बीजिंग येथे होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळविली आहे.
जमैकाच्या महिला धावपटूंनी महिलांच्या 4×100 मी. रिले प्रकारातही आपले वर्चस्व राखले आहे. जमैकाच्या शेरिका जॅक्सनने दुसऱ्या प्रयत्नात 42.96 सेकंदाचा अवधी घेतला. पुरुषांच्या 4×100 मी. रिलेमध्ये कॅनडाच्या आंद्रे डी. ग्रेसने 37.56 सेकंदाचा विश्वविक्रम नोंदविला. तसेच या क्रीडा प्रकारात जर्मनी, नेदरलँड्स आणि नायजेरियाच्या धावपटूंनी गेल्या 40.30 सेकंदाच्या विश्वविक्रमापेक्षा अधिक जलद वेळ नोंदविली.