जळगाव आरटीओ अधिकारी दीपक पाटील 'लाचलुचपत' च्या जाळ्यात
कोल्हापूर :
मोक्याच्या सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती केल्याच्या मोबदल्यात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून तीन लाख ऊपयांची लाच पंटराकरवी घेतल्याप्रकरणी जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील (वय 56, रा. मेहऊण तलावानजीक, लेक होम अपार्टमेंट, जळगाव) आणि पंटर भिकन मुकुंद भावे (वय 52, रा. आदर्शनगर, जळगाव) या दोघांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुऊवारी दुपारी रंगेहाथ पकडले. पाटील याची सुमारे दोन महिन्यापूर्वी कोल्हापूरहून जळगाव येथे बदली झाली आहे. त्यानी यापूर्वी सांगली, अहमदनगर, ठाणे आदी ठिकाणी काम केले आहे.
जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी पाटील यांनी आपल्याच कार्यालयातील तक्रारदार परिवहन अधिकाऱ्यांची नोव्हेंबर महिन्यात नवापूर सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीच्या मोबदल्यात प्रादेशिक अधिकारी पाटील यानी त्याच्याकडे तीन लाख ऊपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार परिवहन अधिकाऱ्याने छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पाटील यांनी तीन लाख ऊपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावऊन गुरुवारी दुपारी सापळा रचला. या सापळ्यात पाटील याचा पंटर भिकन भावेला तक्रारदार परिवहन अधिकाऱ्याच्या घरात लाचेचे तीन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर पाटील यांना जळगाव परिवहन विभागाच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. त्याला लाचलुचपतच्या कार्यालयात आणून त्याची स्वतंत्रपणे चौकशी सुरु केली आहे. याबाबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
जळगावचा पदभार स्वीकारण्यास नव्हते उत्सुक
परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील याची सहा महिन्यापूर्वी कोल्हापूरहून जळगाव येथे बदली झाली होती. बदलीच्या ठिकाणी येण्यास ते उत्सुक नव्हते. त्यामुळे काही महिने त्यानी जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी म्हणून पदभार स्विकारला नव्हता. गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यानी जळगावचा विभागीय कार्यालयाचा पदभार स्विकारला. त्याना तीन लाखाच्या लाच प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.