जळगावात धक्कादायक प्रकार; गणेश विसर्जनाच्या तयारीला गालबोट; धारदार शस्त्राने 40 ढोल फाडले
जळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरवणुकीच्या आदल्या दिवशीच एका पथकाचे तब्बल 40 ढोल धारदार शस्त्राने फाडल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे ढोल-ताशा पथकात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच संबंधितांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी पथकाची तयारी सुरू असताना ढोल फाडण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे मिरवणुकीच्या तयारीवर परिणाम झाला. नेमक्या कोणत्या कारणातून हा प्रकार घडला आणि ढोल फाडणाऱ्यांचा उद्देश काय होता, याबाबत तपासातून माहिती समोर येणे अपेक्षित आहे.
दरम्यान, जळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यंदा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चार हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.