फ्रान्स दौऱ्यात जैतापूर कराराचे नूतनीकरण
रत्नागिरी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फ्रान्स दौऱ्यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात प्र्रान्सच्या संस्थांशी असलेल्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण केल़े या सोबतच दोन्ही देशांनी अणु व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण अािण शिक्षणात सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवल़ी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यापूर्वी फ्रान्स दौरा केल़ा यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केल़ी यावेळी ऊर्जा सुरक्षा आणि कमी कार्बन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी अणुऊर्जा महत्वाची आहे या मुद्यावर सहमती दर्शविण्यात आली. या भेटीनंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आल़े ज्यामध्ये दोन्ही देशांनी लघु मॉडीलर अणुभट्ट्या आणि प्रगत मॉडीलर अणुभट्ट्या या संदर्भात संयुक्त काम करण्यासाठी आशेय पत्रावर स्वाक्षऱ्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
- प्रशिक्षणासाठी सहकार्य वाढवणार
जैतापूर अणुऊर्जासंदर्भात कमिशन रेट अलएनर्जी अॅटोमेटीक एट ऑक्स एनर्जीज अल्टरनेटिव्हज ऑफ फ्रान्स यांच्या गोबल सेंटर फॉर न्यूक्लियर एनर्जी पार्टनरशिप सोबत सहाकार्य करण्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण उभय नेत्यांच्या उपस्थितीत झाल़े दोन्ही देशांनी अणु व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण आणि शिक्षणात सहकार्य वाढवण्यावरून सहमती दर्शवल़ी मुंबईतील वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्थेला अणुतंत्रज्ञ तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आह़े या संस्थेच्या अधिकारी व प्राध्यापकांच्या काही बैठका फ्रान्समधील समकक्ष लोकांसमवेत झाल्या आहेत़ आता त्याला गती ]िमळते का, याची उत्सुकता आह़े
- फ्रान्स दौरा जैतापूरसाठी पुढचे पाऊल
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी 20 हजार कोटी रुपयांचा निधी अणुऊर्जा विकासकामे राखून ठेवण्याची तरतूद जाहीर केली आह़े या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा फ्रान्स दौरा जैतापूर प्रकल्पासाठी पुढचे पाऊल ठरवणारा होईल, अशी अपेक्षा भारत सरकारने व्यक्त केली आह़े