For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jaysingpur crime news | जयसिंगपूर हादरले! २५ लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून निर्घृण हत्या

12:47 PM Apr 15, 2026 IST | NEETA POTDAR
jaysingpur crime news   जयसिंगपूर हादरले  २५ लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून निर्घृण हत्या
Advertisement

                               जयसिंगपूरमध्ये अपहरणानंतर तरुणाचा खून

Advertisement

जयसिंगपूर -येथील भाजीपाला संघ व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४२) या तरुणाचा अपहरण करुन खून केल्याची घडना उघडकीस आली आहे. अपहरणकर्त्यांनी २५ लाख रुपये मागणी करण्यात आली होती. याबाबतची माहिती जयसिंगपूर पोलीस ठाण्यात देण्यासाठी गेले असता पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी व पोलीस पाटील साधारण १२ वाजण्याच्या सुमारास भरतेश यांचा मृतदेह शेतात आढळून आला. या घटनेमुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळी घराजवळच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शरीरावर कानामागे चाकूचा बार तसेच मानेवर, पोटावर, कानाला व गुप्तांगावर शॉक दिल्याच्या खुणा दिसून येत होत्या. त्यानंतर त्यांचा गळा दाबून खून करण्यात
आल्याचे प्राथमिक तपासात आढळून आहे. रात्रीचे अपहरण आणि मध्यरात्रीच त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय आहे. भरतेशच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ, भावजय, पुतण्या व पुतणी असा परिवार आहे.

Advertisement

भरतेश यांचा भाजीपाल्या खरेदी ठिक्रीचा संप आहे. रात्री साधारण साडेनऊ वाजता त्यांचे चुलत बंधू महावीर यांना त्यांचा फोन जाला आणि २५ लाख रुपये द्यायचे आहेत पैसे घेवून या असे सांगितले, त्यानंतर काही इतर व्यतत्रैही बोलते. त्यांनी एक ठिकाण सांगितले तेथे मित्र गेले असता तेथे कोणीच नव्हते. दोनवेळा ठिकाण बदलेते. नंतर माबाईल बंद झाला.

त्यानंतर रात्री अकरा वाजता पोलीस पाटील यांच्यासह काही नित्र व नातेवाईक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी गेले असता. पोलिसांनी गांभिर्यानी घेतले नाही. पहाटे ३ वाजेपर्यंत त्यांची दखतही घेतली नाही. शेवटी बेपताची नोंद घेवून सकाळी बपू असे सांगून पाठविण्यात आले.त्यानंतर मित्र व नातवाईकांनी सकाळपर्यंत अनेक ठिकाणी शोषाशोध घेतली. मात्र भरतेश आढळून आले नाहीत. त्यानंतर खंडणी मागणीसाठी आलेल्या कॉलमयील एका व्यक्तीचा आवाज ओळखण्यात आत्ता त्या दिशेने गावकऱ्याऱ्यांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान सकाळी १० च्याआजपास पोलीस आते.

त्यांनी भरतेश यांच्या पुराजवळ शोध घेऊन सीसीटीव्ही पाहण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आले.त्यानंतर गावकन्यांनी संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले संशपिलांना पोलिसांनी घटनास्थळी नेले. तेथे भरतेश यांचा मृतदेह आढळून आला. तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी पोलिसांच्या तपासातील दिरंगाईमुळे तरुणाचा जीव गेला असा आरोप करीत मृतदेह न हत्तविण्याचे निर्णय घेतला. दरम्यान आमदार राजेंद्र पाटील-पहावकर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी डीवायएसपी अमीत ठाकूर यांना काही सूचना केल्या. लोकभावना सांगितल्या आणि लवकरात लवकर व पारदर्शी तपास करण्याच्या सूचना दिल्या, तसेच नागरिकांना शांत राहण्याची विनंती केली.
दरम्यान संशयित राजदीप ताहे याला ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या एकाला ताब्यात घेतल्याचे समजते, मात्र अद्याप नाव निष्पन्न झाले नाही पोलिसांच्या अकार्यक्षमतेबहुत सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.