For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबा भागात जैशचा ‘ओजीडब्ल्यू’ प्लॅन

06:33 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांबा भागात जैशचा ‘ओजीडब्ल्यू’ प्लॅन
Advertisement

सीमापार ‘मसरूर बडा भाई’ ठरला लाँचिंग पॅड

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत. सोमवारी कथुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 सैनिक हुतात्मा झाले होते. जम्मूमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी जैश-ए-मोहम्मदचा गट ओजीडब्ल्यू (ओव्हर ग्राउंड वर्कर्स) प्लॅन अंतर्गत काम करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्लॅनच्या अंतर्गत स्थानिक सदस्यांची मदत घेत भारतीय सुरक्षा दलांवर ‘अचानक’ हल्ले केले जात आहेत.

Advertisement

जैश-ए-मोहम्मदने सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती, शस्त्रास्त्रs आणि उर्वरित लॉजिस्टिक सपोर्टसाठी स्वत:चे खबरे आणि ओव्हर ग्राउंड वर्कर्सला सक्रीय करण्याचा फर्मान दिला होता. दक्षिण पीर पंजाल हा जम्मूचा भाग असून तेथे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी सर्वाधिक सक्रीय झाले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलिकडेच ‘मसरूर बडा भाई’ असून तो जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा लाँच पँड आहे.

काही महिन्यांपूर्वी याच भागातून घुसखोरी झाली होती. दहशतवादी कथुआ, सांबा आणि हीरानगरच्या भागात असलेल्या ‘चोर गली’चा वापर करत घुसखोरी करतात. ‘चोर गली’ आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेले एक स्थळ आहे, जे जंगल आणि नद्या-नाल्यांनी वेढलेले आहे. या भागात आयएसआय आणि पाक रेंजर्सकडून मिळत असलेल्या सहाय्याच्या बळावर दहशतवाद्यांची घुसखोरी होते.

सूत्रांनुसार कथुआ, सांबा, आरएसपुरा, अरनिया आणि अब्दुलिया सेक्टरसमोर पाकिस्तानच्या सीमेत जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा लाँचिंग पॅड ‘मसरूर बडा भाई’ अस्तित्वात आहे. याचबरोबर ‘सुकमल’, ‘चपराल’ आणि लूनीमध्ये असलेल्या लाँचिंग पॅडच्या आसपास सीमार दहशतवाद्यांच्या हालचाली काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी टिपल्या होत्या.

राष्ट्रीय महामार्ग परिसरातून पलायन

हे सर्व घुसखोरीचे अड्डे आंतरराष्ट्रीय सीमेच्या अत्यंत नजीक आहेत. दहशतवादी याच भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात, कारण येथून केवळ 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा वापर करत ते कुठेही पळून जाऊ शकतात. याचबरोबर या मार्गांचा वापर करत ते सरप्राइज अटॅक केल्यावर जंगलांमध्येच लपून बसू शकतात.

दहशतवादी हल्ल्याचे मिळाले होते इनपूट

दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूदिनी सुरक्षा दलांवर हल्ले होण्याचे इनपूट सुरक्षा यंत्रणांना मागील काही दिवसांपासून सातत्याने मिळत होते. याचमुळे कथुआ जिल्ह्यात हाय अलर्ट होता. सर्व यंत्रणांना खबरदारी बाळगण्याचे निर्देश होते. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या इनपूटनंतर आर्मी स्कूलला सोमवारी सुटी देण्यात आली होती. सुरक्षादलांच्या एका वाहनाला दहशतवाद्यांनी कथुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हारच्या बदनोता येथे लक्ष्य केले. ग्रेनेड फेकल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.

एक महिन्यात दुसरा हल्ला

11 जून रोजी हीरानगरच्या सैडा सोहल भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यानंतर एक महिन्याच्या आत कथुथ जिल्ह्dयात हा दुसरा दहशतवादी हल्ला झाला आहे. सैडा सोहल येथे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले होते. मृत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs हस्तगत झाली होती. कथुआ येथील हल्ल्यानंतर सैन्याला या भागांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बनी आणि मछेडी दोन्ही भागांमध्ये सैन्याची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.