For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जैश मुख्यालयाची युद्धस्तरावर पुन्हा उभारणी

06:03 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
जैश मुख्यालयाची युद्धस्तरावर पुन्हा उभारणी
Advertisement

ऑपरेशन सिंदूरमध्ये झाले होते उद्ध्वस्त : उपग्रहीय छायाचित्रांमधून खुलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ बहावलपूर

भारताने मागील वर्षी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर सुरू करत पाकिस्तानातील दहशतवादी अ•dयांवर क्षेपणास्त्रs डागली होती. यादरम्यान पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील जैश-ए-मोहम्मद मुख्यालयावर अचूक हल्ला करत ते उद्ध्वस्त करण्यात आले होते. दहशतवादी मसूद अझहरची संघटना जैश आता या नुकसानातून सावरत पुन्हा सक्रीय होतेय. बहावलपूरमध्ये जैशच्या मुख्यालयात मोठ्या प्रमाणात निर्मितीकार्य सुरू असून याच्या अनेक इमारती उभारण्यात आल्याचे उपग्रहीय छायाचित्रांमधून कळते.

Advertisement

जैश-ए-मोहम्मद बहावलपूमध्ये स्वत:च्या मुख्यालयाची पुन्हा उभारणी करत आहे. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये एन-5 राष्ट्रीय महामार्गानजीक स्थित ‘जामिया सुभान अल्लाह’ नावाच्या या परिसराच्या उपग्रहीय छायाचित्रांमध्ये अवजड यंत्रसामग्री आणि बांधकाम विषयक वाहने दिसून आली आहेत.

प्रार्थनास्थळाची उभारणी

अमेरिकेतील अंतराळ तंत्रज्ञान कंपनी वँटोरच्या ओपन-सोर्स इंटेलिजेन्स टीमने उपग्रहीय छायाचित्रांच्या आधारावर परिसरातील मशिदीच्या नुकसानग्रस्त गुबंदांची दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगितले आहे. या ठिकाणी अलिकडेच काम करण्यात आले आहे. आसपासच्या अनेक इमारतींची देखील अलिकडेच दुरुस्ती करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असलेले बहावलपूर हे जैशचे एकमात्र ठिकाण नाही. पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमध्येही जैशच्या ठिकाणांवर निर्मितीकार्य सुरू असल्याचे समोर आले आहे. जैशशी निगडित ठिकाण सैयदना बिलाल मस्जिदला पुन्हा उभारण्यात येत आहे. याच कथित प्रार्थनास्थळाचे ऑपरेशन सिंदूरदरम्यान नुकसान झाले होते.

अनेक ठिकाणी काम पूर्ण

बहावलपूर येथील ज्या ठिकाणाला भारताने लक्ष्य केले होते, तेथे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. मरकज सुभान अल्लाहवरील गुबंद आता नीट करण्यात आले आहेत. संबंधित दहशतवादी अ•dयाला पुन्हा सुरू करण्याचा हा प्रयत्न असल्याचे इंटेल लॅबचे भू-गुप्तचर संशोधक डॅमियन सायमन यांनी सांगितले आहे. हल्ल्यांमुळे नुकसानग्रस्त झालेल्या इमारतींचा ढिगारा हटविण्यात येतोय. तर मुजफ्फराबादमध्ये सैयदना बिलाल मस्जिदला पूर्णपणे पुन्हा निर्माण करण्यात येत आहे. भारताच्या कारवाईत मस्जिदच्या इमारतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर त्या इमारतीची दुरुस्ती करणे शक्य नव्हते. अशास्थितीत ही इमारत पुन्हा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असे सायमन यांचे सांगणे आहे.

एफएटीएफच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह

पाकिस्तानातील दहशतवादी गटांच्या हालचालींवर एफएटीएफची (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) देखरेख आहे. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणे हे एफएटीएफचे काम आहे. जैश-ए-मोहम्मद उघडपणे ’सुभान अल्लाह परिसर’ पुन्हा निर्माण करण्यासाठी निधी संकलन अभियान राबवत आहे. याकडे एफएटीएफ दुर्लक्ष करत आहे. पाकिस्तानातील दहशतवादी गटांना आश्रय मिळणे सुरूच आहे. जैशचा म्होरक्या मसूद अझहर स्वत:च्या कारवाया सातत्याने करत आहे.

कोट्स

बहावलपूरमध्ये जैश मुख्यालयाची पुनर्निर्मिती सुरू असल्याचे उपग्रहीय छायाचित्रांमधून स्पष्ट होते. परिसरातील गुबंदांची दुरुस्ती करण्यात आली आहे. परिसरात अन्य घडामोडीही स्पष्ट रुपात दिसून येत असून त्या ठिकाणी अवजड यंत्रसामग्री पोहोचली आहे.

डॅमियन सायमन, संशोधक

Advertisement
Tags :

.