कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जैशने शाहीनला सोपविली होती जबाबदारी

06:18 AM Nov 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लखनौच्या डॉक्टर शाहीनची पूर्ण कहाणी :       

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात मिळालेल्या स्फोटकांमुळे मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. सोमवारी सकाळी ही स्फोटके सापडली होती आणि संध्याकाळी दिल्लीत कारस्फोट झाला. आता याप्रकरणी तपासाला वेग मिळाला असून याचदरम्यान लखनौ येथील एका महिला डॉक्टर शाहीन शाहिदला अटक करण्यात आली आहे. शाहीन ही जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होती आणि तिला महिला दहशतवाद्यांच्या भरतीची जबाबदारी मिळाली होती. जैश-ए-मोहम्मद महिलांना दहशतवादात सामील करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती.

पाकिस्तानातून सक्रीय जैशने रितसर एक वेगळी शाखा निर्माण करत याला जमात उल-मोमिनात हे नाव दिले आहे. याचे नेतृत्व पाकिस्तानात बसलेला क्रूर दहशतवादी मसूद अझहरची बहिण सादिया अझहर करते. सादिया अझहरचा पती युसूफ अझहरला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या पंजाबमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ठार केले होते. युसूफ अझहर हा कंधार विमान अपहरण प्रकरणातही सामील होता. आता त्याची पत्नी जगात दहशतवादाचे नवे क्रूर रुप उभे करू पाहत आहे.

फरीदाबाद मॉड्यूलमध्ये पकडण्यात आलेल्या शाहीन शाहिदच्या कारमधून एके-47 हस्तगत करण्यात आली आहे. शाहीन हे लखनौच्या लालबाग येथील रहिवासी आहे. शाहीन ही अल-फलाह विद्यापीठाची सदस्य असून तिचे काश्मिरी डॉक्टर मुजम्मिल गनई उर्फ मुसैबशी जवळचे नाते असल्याचे मानले जाते. मुजम्मिलला फरीदाबादमध्ये त्याच्या दोन खोल्यांच्या घरातून 2900 किलोग्रॅम स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ हस्तगत झाल्यावर अटक करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील कोइलचा मूळ रहिवासी असलेला मुजम्मिल दिल्लीपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावरील धौज येथील अल-फलाह विद्यापीठात एक डॉक्टर म्हणून कार्यरत होता. मुजम्मिलला जम्मू-काश्मीर पोलिसांकडून श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्याप्रकरणी वाँटेड म्हणून घोषित केल्यावर अटक करण्यात आली होती.

रायफल, पिस्तुल आणि दारूगोळा ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली कार शाहीन शाहिदची असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून मुजम्मिलच्या प्रारंभिक चौकशीत मारुती सुझुकी स्विफ्ट कारची झडती घेण्यात आली होती. शाहिनने भारतात महिला दहशतवाद्यांची फौज उभी करण्यासाठी प्रयत्न चालविले हाते. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये 8 ऑक्टोबर रोजी महिला दहशतवाद्यांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली होती आणि भारतात याची जबाबदारी काही दिवसातच शाहिनकडे देण्यात आली होती. शाहिन हे पेशाने मेडिकल प्रोफेशनल असून अल-फलाह रुग्णालयात ती डॉ. मुजम्मिल शकीलसोबत काम करत होती.

मूळची लखनौची

डॉक्टर शाहीनचा परिवार लखनौतील लालबाग येथे राहतो. तिचे वडिल स्वत:चा पुत्र शोएबसोबत तेथे राहतात. शाहीनने प्रयागराज येथून वैद्यकीय शिक्षण घेतले होते. शाहीनचा विवाह महाराष्ट्रातील एका इसमासोबत झाला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article