टपाल कर्मचारी संघटना वर्ग ३ च्या जिल्हाध्यक्षपदी जयराम बावलेकर
तर सेक्रेटरीपदी संदीप कसपले ; संघटनेच्या द्वैवार्षिक अधिवेशनात एक मताने निवड
ओटवणे प्रतिनिधी
अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना वर्ग ३ च्या सिंधुदुर्ग विभाग अध्यक्षपदी जयराम बावलेकर, सेक्रेटरीपदी संदीप कसपले तर खजिनदारपदी समीर पांगुळ यांची एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना वर्ग ३ च्या सिंधुदुर्ग विभागाच्या कुडाळ हॉटेल लाईम लाईटच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये झालेल्या द्वैवार्षिक अधिवेशनात ही नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.या द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना वर्ग ३ चे सर्कल सेक्रेटरी सुरेंद्र पालव यांच्याहस्ते झाले. यावेळी मुंबई जी पी ओ शाखेचे रिजनल सेक्रेटरी गुरुदत्त आलवे, उपाध्यक्ष सर्कल कमिटी गणपत खेडेकर, गोवा रिजनल सेक्रेटरी नितीन नेमळेकर, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी सर्कल भारत घाटगे आदी उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना वर्ग ३ चे सर्कल सेक्रेटरी सुरेंद्र पालव यांनी या अधिवेशनात संघटनेची मान्यतेबाबत सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच संघटना डी रिकोनाईज नसल्याचे पटवून दिले. तसेच सध्या चालू असलेली इस्टॅब्लिशमेंट रिव्हबाबत सर्व उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. ईस्टबाबतही आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याची जाणीव करून देताना इस्टॅब्लिशमेंटबाबत सरकारचे धोरण आणि संघटनेची भूमिका स्पष्ट केली. एनडीसी या धोरणाबाबत सगळ्यांना अवगत करून त्यातील मर्यादा आणि संघटनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी हिंदी भाषिक सभासदासाठी संपूर्ण भाषण हिंदीमधून दिले. तसेच त्यांच्या समस्यावर मार्मिक भाष्य करुन त्यांनाही संघटनेप्रती ओढ निर्माण केली. यावेळी सिंधुदुर्ग विभागातील सर्व संघटना पदाधिकारी आणि सभासद सदर अधिवेशनाला उपस्थित होते.