For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळ थलैवासकडून जयपूर पँथर्स पराभूत

06:32 AM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
तामिळ थलैवासकडून जयपूर पँथर्स पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

2025 च्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील येथे झालेल्या सामन्यात तामिळ थलैवासने जयपूर पिंक पँथर्सचा 37-28 अशा गुणांनी पराभव केला. या विजयामुळे तामिळ थलैवासने आपली 3 सामन्यातील सलग पराभवाची मालिका खंडीत केली.

या सामन्यात तामिळ थलैवासचा कर्णधार अर्जुन देसवालने 13 गुण तर सुरेश जाधव आणि नितीशकुमार यांनी प्रत्येकी 5 गुण मिळविले. सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघातील आघाडीच्या फळीने आक्रमक खेळाचे दर्शन घडविले. या कालावधीत तामिळ थलैवासने जयपूर पँथर्सवर 8-6 अशी 2 गुणांची आघाडी मिळवली होती. सामन्याच्या दुसऱ्या 10 मिनिटांच्या सत्रामध्ये दोन्ही संघातील चढाईपटूंनी झटपट गुण वसूल केले. जयपूर संघातील आर्यन कुमारने तामिळ थलैवासच्या अर्जुन देसवालच्या चढाया समर्थपणे रोखल्या. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत तामिळ थलैवासने जयपूरवर 14-13 अशा केवळ एका गुणाची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या तिसऱ्या सत्रामध्ये तामिळ थलैवासने आपली गुणांची आघाडी झटपट वाढविली. तिसऱ्या सत्राअखेर तामिळ थलैवासने जयपूरवर 27-22 अशी 5 गुणांची बडत मिळविली होती. तामिळ थलैवासचा कर्णधार अर्जुन देसवालने सुपर 10 गुण नोंदविले. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जयपूर पिंक पँथर्सने आपल्या डावपेचात खूपच बदल केला. पण त्यांना तामिळ थलैवासची 9 गुणांची आघाडी गाठता आली नाही. अखेर हा सामना तामिळ थलैवासने जिंकला.

Advertisement

Advertisement
Tags :

.