For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिंगुळीत 51 दिव्यांगाना जयपूर फूटचे वाटप

04:54 PM Mar 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पिंगुळीत 51 दिव्यांगाना जयपूर फूटचे वाटप
Advertisement

प.पू. विनायक (अण्णा ) महाराज यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य ; दिव्यांग बाधवांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Advertisement

कुडाळ -
प.पू. विनायक (अण्णा) महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व प.पू.राऊळ महाराज संस्थान ( पिंगुळी ) ,रोटरी लोककल्याण मंडळ (कोल्हापूर) आणि प्रा. डॉ. एस. एन. ओझा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा जयपूर फूट' (कृत्रिम पाय) चे मोफत वाटप करण्यात आले. केवळ कृत्रिम पायच मिळाले नाहीत, तर स्वावलंबी जगण्याची नवी उमेदही मिळाल्याचा आनंदाने या दिव्यांग बाधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.मानवता हीच खरी ईश्वरसेवा" हा मंत्र केवळ शब्दांत न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरविणाऱ्या प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि प.पू.राऊळ महाराज संस्थान (पिंगुळी ) यांच्या पुढाकाराने प.पू. विनायक (अण्णा ) महाराज यांच्या ८१ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.श्री क्षेत्र पिंगुळी येथील प.पू.राऊळ महाराज समाधी मंदिरासमोर या शिबिराचे उद्घाटन संस्थानच्या अध्यक्षा प.पू. संगीता उर्फ बाईमाँ राऊळ यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संतोष सामंत व जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर उपस्थित होते.रोटरी लोककल्याण मंडळाचे व्यवस्थापक तानाजी चव्हाण, तंत्रज्ञ सुहास कुरणे, अरुण कांबळे, प्रोस्थेटिक तज्ज्ञ बबन पाटील आणि अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. योगेश नवांगुळ यांचा सातत्यपूर्ण आणि नि:स्वार्थ सेवेबद्दल संस्थानचे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याला कोषाध्यक्ष दशरथ राऊळ, विश्वस्त शिवराम राऊळ, विठोबा राऊळ, अशोक तेजम, सुनील फणसेकर, विवेक पार्सेकर, प्रदीप आमोणकर, श्रद्धा खामकर, अशोक कदम, विनय पाटील, महादेव पांगे, महेश धुरी, महेंद्र कुडकर, नारायण आप्पा राऊळ आणि गिरीधर आप्पा राऊळ उपस्थित होते. नवांगुळ यांनी ट्रस्टच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पिंगुळी संस्थानने अध्यात्म आणि समाजसेवा यांचा जो आदर्श संगम घडवून आणला आहे.तो संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मधुमेही रुग्णांसाठी आधुनिक 'पॉली युरेथिन' कवच** तानाजी चव्हाण म्हणाले, मधुमेह असलेल्या रुग्णांना कृत्रिम पाय वापरताना त्वचेला जखम होण्याचा मोठा धोका असतो. बाजारात मिळणारे सिलिकॉन अशा रुग्णांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. यावर उपाय म्हणून आम्ही विशेष पॉली युरेथिन शीट पासून तयार केले सॉफ्ट लायनर सर्व ५१ लाभार्थींना मोफत दिले. त्यामुळे त्यांना कोणतीही शारीरिक इजा न होता सन्मानाने चालता येईल ,असे सांगितले.३० जानेवारी रोजी झालेल्या मोजमाप शिबिरानंतर अण्णा महाराज यांच्या जयंतीदिनी लाभार्थींना प्रत्यक्ष फिटिंग करून देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रदीप साटम, प्रकाश पिंगुळकर, सदाशिव प्रभावळे, राजू वखरे,अरविंद कदम,राजेश मुणगेकर,लक्ष्मण वालावलकर,नितीन मांजरेकर,प्रसाद दळवी तसेच ओझा फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ट्रस्टचे सचिव राजन पांचाळ यांनी मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.