महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंजाबचा जयपालसिंग विजेता

06:41 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ शिलाँग

Advertisement

शुक्रवारी येथे झालेल्या राष्ट्रीय मुष्ठीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत पंजाबचा युवा मुष्ठीयोद्धा जयपालसिंगने 92 किलोवरील वजन गटातील जेतेपद पटकाविताना राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सागर अहलावतचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.

Advertisement

पंजाबच्या जयपालने गेल्या वर्षी या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. मात्र यावेळी त्याने जोरदार सराव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत 48 किलो वजन गटात सेनादलाच्या बारुनसिंगने मनिपूरच्या सोईबामचा 5-0 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. सेनादलाच्या अमित पांगलने 51 किलो गटात सुवर्णपदक मिळविताना चंदीगडच्या अनशुल पुनियाचा 5-0 असा फडशा पाडला. 54 किलो गटात हवाई दलाच्या ललितने, 57 किलो गटात सेनादलाच्या सचिन सिवाच ज्युनिअरने, 60 किलो गटात सेनादलाच्या आकाशकुमारने, 63.5 किलो गटात आसामच्या शिवा थापाने, 67 किलो गटात सेनादलाच्या रजतने, 71 किलो गटात सेनादलाच्या आकाश सांगवानने, 75 किलो गटात सेनादलाच्या दिपकने, 80 किलो गटात सेनादलाच्या लक्ष्य चहरने, 86 किलो गटात सेना दलाच्या जुगनूने, 92 किलो गटात सेनादलाच्या संजितने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत सेनादलाने सांघिक विजेतेपद पटकाविले. तर सेनादलाचा आकाश सांगवान हा सर्वोत्तम मुष्ठीयोद्धा म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews
Next Article