जैन संघटनेने 186 लक्झरी कार केल्या खरेदी
150 कोटी रुपयांच्या करारात 21 कोटी रुपयांची सवलत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणजेच जेआयटीओ यांना कार खरेदीवर 21.22 कोटी रुपयांच्या सूटसह प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. जेआयटीआने देशभरातील त्यांच्या सदस्यांकडून 186 लक्झरी कार खरेदी केल्या आहेत.
या कारची एकूण किंमत 149.54 कोटी रुपये आहे. या करारात त्यांना 21.22 कोटी रुपयांची मोठी सूट मिळाली. संस्थेच्या सदस्यांनी ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या 15 टॉप ब्रँडच्या कार खरेदी केल्या.
यापैकी बहुतेक खरेदीदार गुजरातमधील आणि विशेषत: अहमदाबादमधील आहेत. या मोठ्या कराराद्वारे जेआयटीओ आपल्या सदस्यांना मोठे फायदे देते. या संघटनेचे देशभरात 65,000 हून अधिक सदस्य आहेत. जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे देशभरात 65,000 हून अधिक सदस्य आहेत. या मोठ्या ऑर्डरसाठी त्यांनी थेट लक्झरी ब्रँड डीलर्सशी संवाद साधला. जेआयटीओचे उपाध्यक्ष हिमांशू शाह म्हणाले, ‘सामुदायिक खरेदीमुळे आम्हाला अधिक सौदेबाजीची शक्ती मिळते’.
कंपन्यांना याचा फायदा देखील होतो, कारण त्यांना एकाच वेळी मोठ्या संख्येने ग्राहक मिळतात आणि त्यांचा मार्केटिंग खर्च कमी होतो. या मोठ्या व्यवहाराद्वारे, सदस्यांनी एकत्रितपणे 60 लाख रुपयांपासून ते 1.34 कोटी रुपयांपर्यंतच्या कारवर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केली असेही त्यांनी यावेळी सांगितले.