For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जैन तांत्रिक महाविद्यालयकडे व्हीटीयू चषक

11:01 AM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
जैन तांत्रिक महाविद्यालयकडे व्हीटीयू चषक
Advertisement

समर्थ आर मालिकावीर, प्रफुल कटारिया सामनावीर

Advertisement

बेळगाव : केएलएस गोगटे तांत्रिक महाविद्यालय महाविद्यालय आयोजित व्हिटियू चषक आंतर तांत्रिक महाविद्यालय टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जैन इंजिनिअरिंग संघाने व्हीटीयू बेळगाव संघाचा 15 धावांनी पराभव करून व्हीटीयू चषक पटकाविला. समर्थ आर व्हिटियू  याला मालिकावीराने तर, प्रफुल कटारिया याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. जीआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात जैन तांत्रिक महाविद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना 24.2 षटकात सर्व गडी बाद 141 धावा केल्या. त्यात झिनत एबीएम ने 9 चौकारासह 53, साई कारेकरने 3 चौकारासह 31,  तर अथर्व गोरलेकरने  18 धावा केल्या. व्हिटियू तर्फे गणेश काजदारने 18 धावात 3, चेतन कोडगीने 16 धावात 2, सुमंत आरने 24 धावात 2 तर, रोहित होन्नावरने एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना व्हीटीयू बेळगाव संघाचा डाव 22.2 षटकात 125 धावात आटोपला. त्यात रोहित होनकणण्णवरने 4 चौकारासह 27, रोहित ढवळेने 22, तर चेतन कोटगीने 16 धावा केल्या. जैन तर्फे प्रफुल कटारियाने 30 धावा 4, साई कारेकरने 22 धावा 2,  प्रणित तेरदाळने 36 धावात 2 तर निरंजन पाटील व जिनत एबीएम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या जैन इंजिनिअरिंग व उपविजेत्या व्हीटीयु संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट झेल विनय पाटील व्हिटियू, उत्कृष्ट फलंदाज झीनत एबीएम जैन, उत्कृष्ट गोलंदाज प्रणित टी जैन, अंतिम सामन्यातील सामनावीर प्रफुल कटारिया जैन तर मालिकावीर समर्थ आर व्हीटीयू यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून तेजस पवार, ईश्वरी इटगी, वीरेश गौडर, सुजित शिंदोळकर, गणेश मुतकेकर यांनी  तर स्कोरर म्हणून प्रमोद जपे, रवी कणबर्गे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओजस रेवणकर, आकाश मंडोळकर, शुभशिवा साशा, विक्यात कट्टी, पियुष पताडे, क्रिझन इराणी, गिरीश कडलास्कर यांनीतर ग्राउंड्समन माऊती लक्ष्मण गणेश वैयटी कांबळे  विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.