महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार जयदीप

06:28 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘पाताल लोक’ आणि ‘द ब्रोकन न्यूज’ या सीरिजनंतर अभिनेता जयदीप अहलावत आता आणखी एका वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. परंतु यावेळी त्याचा सामना मनोज वाजपेयीशी होणार आहे.

Advertisement

मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत असलेली वेबसीरिज द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनमध्ये जयदीप दिसून येणार आहे. त्याच्या यातील भूमिकेविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही. परंतु तो अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार हे निश्चित मानले जात आहे. पाताल लोक वेबसीरिज आणि जाने जान चित्रपटातील स्वत:च्या अभिनयासाठी कौतुकास पात्र ठरलेल्या जयदीपसमोर या सीरिजमध्ये दमदार अभिनय दाखविण्याचे आव्हान असणार आहे. कारण याचे मागील दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत.

Advertisement

तिसऱ्या सीझनच्या कहाणीत नागालँड राज्यातील पार्श्वभूमी दिसून येणार आहे. याकरता याची टीम नागालँडची राजधानी कोहिमामध्ये चित्रिकरण करत आहे. ऑक्टोबर महिन्यात याचे येथील चित्रिकरण संपणार आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या काही स्थानिक कलाकारांना या तिसऱ्या सीझनमध्ये संधी देण्यात आल्याचे समजते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article