For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयसीसी चेअरमनपदी जय शहा बिनविरोध

06:56 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयसीसी चेअरमनपदी जय शहा बिनविरोध
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) चेअरमनपदी बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जय शहा यांनी ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे सचिवपद आणि जानेवारी 2021 पासून आशिया क्रिकेट कौन्सिलचे चेअरमनपद भूषविले आहे. आयसीसी चेअरमनपदाचा त्यांचा कार्यकाल 1 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.

आयसीसीचे विद्यमान चेअरमन ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्यांदा या पदासाठी आपण इच्छुक नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे या पदासाठी ते एकमेव उमेदवार होते. यानंतर आयसीसीने जय शहा यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याची लोकप्रियता वाढीस लावणे यासाठी आपले यापुढे प्रयत्न राहतील. तसेच 2028 च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा सहभाग करण्यासाठी प्रयत्न करणार असून क्रिकेटच्या वाढीसाठी ती एक उत्तम संधी ठरेल.  आयसीसी कार्यकारिणी समितीच्या सदस्यांसमवेत क्रिकेटच्या प्रसारासाठी एकत्रित काम करण्याचे आश्वासन जय शहा यांनी दिले. आयसीसीचे चेअरमनपद भूषविणारे जय शहा हे सर्वात तरुण म्हणून नोंद झाली आहे. यापूर्वी भारताचे जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांनी आयसीसीचे चेअरमनपद भूषविले होते. आता हे प्रतिष्ठेचे पद भूषविणारे जय शहा हे पाचवे भारतीय आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.