For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune News : जय पवारांनी बांधावर जाऊन केली शेती नुकसानीची पाहणी..

02:08 PM Apr 05, 2026 IST | NEETA POTDAR
pune news   जय पवारांनी बांधावर जाऊन केली शेती नुकसानीची पाहणी
Advertisement

बारामतीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Advertisement

बारामती : बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

Advertisement

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येतील आणि शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल. तसेच, या संपूर्ण प्रकरणात स्वतः लक्ष घालून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.