जय भारत क्लासीक शरीरसौष्ठव स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग अॅण्ड स्पोर्ट्स आयोजित जय भारत क्लासीक बेळगाव जिल्हा ग्रामीण, महाविद्यालयीन टॉपटेन व दिव्यांग टॉपटेन शरीरसौष्ठव स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडीयर हितेंद्र मराठे, कर्नल अर्पित थापा, मिहीर पोतदार, जयभारत फौंडेशनचे दयानंद कदम, बसवराज पाटील, प्रेमनाथ नाईक, मि. रणजीत किल्लेकर व ज्येष्ठ शरीरसौष्ठवपटू किशोर गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान प्रतिमेचे पूजन करुन झाले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण विभागातून जवळपास 75 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. 55, 60, 65, 70,75 व 75 वरील गटात स्पर्धा घेण्यात आल्या. तर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयीन टॉपटेन स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेत 20 महाविद्यालयीन स्पर्धकांनी तर दिव्यांग गटात 7 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. यावेळी अनिल अमरोळे, राजेश लोहारसह इतर मान्यवर उपस्थित होते.