For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jaggery Price Hike | कोल्हापुरात गुळाचा भडका! क्विंटलचा दर 'इतक्या' हजारांवर, सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला कात्री

01:15 PM Aug 24, 2026 IST | NEETA POTDAR
jaggery price hike   कोल्हापुरात गुळाचा भडका  क्विंटलचा दर  इतक्या  हजारांवर  सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला कात्री
Advertisement

कोल्हापूर -गुजरातमधील कोल्ड स्टोअरेज गुळाचा कमी झालेला साठा, हळूहळू, कमी होत चाललेली गुडाळे आणि सणासुदीच्या दिवसात गुळाची सातत्याने होत असलेली मागणी या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात किलोमागे ४० ते ८० रुपयापर्यंत दर वाढ झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाची कधी नव्हे ते कोल्हापूर, सांगली बाजारपेठ व गुजरातमध्येही दरवाढीचा थेट परिणाम पोहोचला आहे.

Advertisement

या उच्चांकी दरवाढीचा फटका सणासुदीत ग्राहकांना बसणार आहे.गुळ उत्पादकांनी घेतलेली घडकी हे देखील या गुळ दरवाढीचे एक कारण ठरले आहे. घाऊक बाजारात गुळदरात वाढ झाल्यानंतर आता किरकोळ गुळाचा दरही ऐंशीवरगुळाची दरवाढ कमी जास्त प्रमाणात होत असते. पण या आठवड्यात क्विंटलला आठ हजार रुपयापर्यंत झालेली दरवाढ नक्कीच एरव्ही कमी जास्तहोणाऱ्या दरवाढीच्या तुलनेत खूप ज्यादा व उच्चांकी झाली आहे, अशी प्रतिक्रिया शाहूपुरी मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'तरुण भारत संवाद"शी व्यक्त केली.

ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार व समितीत एक दिवस आडयाप्रमाणे गुळाचे सौदे सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ११ गुऱ्हाळघरे सध्या सुरू आहेत.

Advertisement

कर्नाटक, सांगली परिसरातही गुऱ्हाळघरांची संख्या कमी झाली आहे. शिवाय या काळात गुजरात कोल्ड स्टोअरेजमध्ये असलेल्या गुळाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे गुळाची आवक कमी आहे आणि सणासुदीच्या काळात गुळाची मागणी कायम आहे. त्याचे परिणाम दरावर नक्कीच झालेले आहेत. ते म्हणाले, कोल्हापूर बाजारपेठेत गुळाचे सौदे एक दिवस आड सुरु असले तरी तुलनेने गुळाचा साठा कमीच आहे. अगदी शंभर टक्के सांगता येत नाही, पण आयुक्ततुकाराम मुंढे यांच्या धाडसत्राचाही परिणाम गूळ उत्पादनावर झाला आहे. गेल्या आठवड्यात गुळाचा १०० किलोचा भाव ४ हजार ५०० रुपये होता.

Advertisement
Tags :

.