महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुहूर्तावर गुळाला प्रति क्विंटल 3500 ते 5601 रूपये दर

04:38 PM Nov 04, 2024 IST | Radhika Patil
Jaggery price at Muhurta is Rs 3500 to Rs 5601 per quintal
Advertisement

कोल्हापूर/ प्रतिनिधी : 

Advertisement

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डमध्ये शनिवारी दिपावली पाडव्यानिमित गूळ सौदे काढण्यात आले. या सौद्यामध्ये गूळाला प्रति क्लिंटल 3500 ते 5601 रूपये असा मिळाला. हे सौदे शेतकरी सेवा या अडत दुकानामध्ये काढाण्यात आले.

Advertisement

या मुहूर्तावर शेतकरी सागर लहु येरूडकर यांच्या गूळास प्रति क्लिंटल 5601 रूपये दर मिळाला. सदरचा गूळ चिनुभाई अंबालाल पटेल यांनी खरेदी केला. या चांगल्या दरामुळे गूळ उत्पादकामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

हे सौदे जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या हस्ते काढण्यात आले. स्वागत सभापती प्रकाश देसाई यांनी केले. यावेळी बाजार समितीचे सदस्य पैलवान संभाजी पाटील , भारत पाटील (चुयेकर), शंकर पाटील, सुयोग वाडकर, पांडुरंग काशिद, राजाराम चव्हाण, दिलीप पोवार, सचिव जयवंत नाना पाटील, समितीचे अधिकारी, कर्मचारी, अडते, व्यापारी, हमाल ,तोलाईदार आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article