गूळ सौदे पूर्ववत सुरू
कोल्हापूर
कर्नाटकी गुळामुळे व कोल्हापूरी गुळाचा दर घसरल्याने, सोमवारी कोल्हापूर बाजार समितीच्या गुळ विभागामधील सोदे बंद पडले होते. मंगळवारी हे सौदे पूर्ववत सुरू झाले असून, एक किलो बॉक्सची मागणी नव्हती. मंगळवारी नियमबाहय दोन ठिकाणी सोदे काढण्यात आल्याची चर्चा सुरू होती.
साखर मिश्रीत कर्नाटकी गुळाची विक्री सौदे न काढता विक्री सुरू आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाचा दर घसरल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी गुळ सौदे बंद ठेवले होते. रविवारी सुट्टी असल्याने, तर सोमवारी सोदे बंद असल्याने, आवक झालेल्या गुळाचा मोठा साठा झाला होता. मंगळवारी सौदे सुरू झाल्याने, माथाडी लोकाकडून गुळाला पॅकींग करण्याचे काम सुरू होते.
सर्व व्यापारी, खरेदीदार यांना एका दिवशी एकाच ठिकाणी सौदे काढण्याचा नियम कमिटीचा आहे. यामुळे सर्वांना सौद्यामध्ये भाग घेता येते. पण मंगळवारी कमिटीच्या संचालकामधील एका नातेवाईकांने , नियमबाहय अशा दोन ठिकाणी सोदे काढले असल्याची चर्चां या ठिकाणी सुरू होती. 30 किलोच्या 9230 रव्याची आवक तर एक किलोच्या 9435 बॉक्सची आवक झाली. प्रतवारीनुसार गुळाचा दर 3700 ते 4600 रूपये क्विंटल असा निघाला होता.