For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगदीश शेट्टर यांचा येळ्ळुरात प्रचार

10:36 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगदीश शेट्टर यांचा येळ्ळुरात प्रचार
Advertisement

चांगळेश्वरी देवी-कुस्ती मैदानाला भेट

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी तालुक्याच्या ग्रामीण भागात जाऊन जोरदार प्रचार केला. सध्या येळ्ळूर येथील चांगळेश्वरी व कलमेश्वर यात्रा सुरू असल्याने गुरुवारी येळ्ळूरचे ग्रामदैवत चांगळेश्वरी मातेचे दर्शन घेतले. यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानाला भेट देऊन पैलवान तसेच उपस्थित नागरिकांचा उत्साह वाढविला. जगदीश शेट्टर यांचे मोठ्या थाटात कुस्ती मैदानावर स्वागत करण्यात आले.

सी. टी. रवी यांची पत्रकार परिषद

Advertisement

प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणाबाबत सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. महिला न्यायाधीशांच्या पथकाने तपास केल्यानंतर या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल. चौकशीपूर्वी कोणालाही दोषी घोषित करणे योग्य होणार नाही. परंतु, काँग्रेसकडून मात्र हा एनडीएचा गुन्हा असल्याचे चित्र पसरविले जात असल्याचा आरोप माजी मंत्री सी. टी. रवी यांनी केला. गुरुवारी सदाशिवनगर येथील भाजप माध्यम कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपची कोणतीही कृती काँग्रेसला योग्य वाटत नाही. केवळ भूलथापा मारून नागरिकांमध्ये खोटा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काँग्रेसच्या या कृतीला थारा न देता भाजपला अधिकाधिक मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपचे प्रवक्ते एम. बी. जिरली, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, एफ. एस. सिद्दनगौडा, हनुमंत कोंगाली यासह इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तब्येतीची केली विचारपूस

भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी सौंदत्तीचे माजी आमदार डॉ. आनंद मामनी यांच्या आई गंगम्मा चंद्रशेखर मामनी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये गंगम्मा यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून आजारपणातून लवकरच बाहेर पडा, अशी सदिच्छा शेट्टर यांनी व्यक्त केली. यावेळी केएलईचे डॉक्टर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.