महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जगदीश शेट्टर यांचा प्रचाराचा धडाका

10:49 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री कंग्राळी खुर्द येथे झालेल्या सभेला भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कार्यक्षम राहू, असे आश्वासन त्यांनी बेळगावच्या मतदारांना दिले. भाजपच्या कार्यकाळातच बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी मतदारसंघाचा कायापालट केला. केंद्र सरकारचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प बेळगावमध्ये आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बेळगावचे विमानतळ व रेल्वे स्थानकाला अत्याधुनिक रूप देण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. मंगला अंगडी यांनीही पाठपुरावा करत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. याच पद्धतीने बेळगावचा विकास साधला जाईल, असे शेट्टर यांनी सांगितले. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, महांतेश कवटगीमठ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

गुरुवारी सौंदत्ती तालुक्यात प्रचार

Advertisement

जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी सौंदत्ती तालुक्याच्या विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. इटनाळ या गावी प्रचारसभा घेत नरेंद्र मोदी यांनी देशभरात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यापूर्वी सत्तीगिरी गावातील दुर्गादेवी व रामलिंगेश्वर मंदिराला भेट देऊन कार्यकर्त्यांसमवेत आशीर्वाद घेतला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article