महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जगदीश शेट्टर यांचा रामदुर्ग परिसरात प्रचार

10:00 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी रामदुर्ग परिसरात जोरदार प्रचार केला. बागोजीकोप्प, चिकोप्पा, होसळ्ळी, हुलाकोंडा या गावांमध्ये प्रचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना प्रभावीपणे लागू करण्यात आल्याने मागील दहा वर्षात शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळू शकला. त्यामुळे भाजपलाच पुन्हा एकदा साथ द्यावी, असे आवाहन जगदीश शेट्टर यांनी केले. यावेळी बोलताना माजी आमदार महादेवप्पा यादवाड म्हणाले, राज्यात अनेक वाईट घटना घडत आहेत. हुबळी येथे नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. गदग येथे चार जणांची हत्या झाली. या घटना निंदनीय असून राज्य सरकार अपयशी ठरत आहे. जगदीश शेट्टर यांनी रामदुर्गच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात रामदुर्ग तालुक्यासाठी मिनी विधानसौधची निर्मिती झाल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी नागरिकांना मार्गदर्शन करून देशाच्या राजकारणात भाजप किती महत्त्वाचा आहे, याविषयी माहिती दिली.  हणमंत निराणी, राजेश बिळगी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

मुनवळ्ळी येथे जाऊन पीडितेचे सांत्वन

Advertisement

सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे एका मागासवर्गीय महिलेला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाने धर्मांतरासाठी छळ केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते. संबंधित पीडितेच्या घरी सोमवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्या महिलेचे सांत्वन केले. तसेच आरोपीला अधिकाधिक शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, साबण्णा तळवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article