महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खेडमध्ये जगबुडीचे पाणी मटण मच्छी मार्केटमध्ये घुसले!

03:17 PM Sep 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
Jagbudi
Advertisement

खेड /प्रतिनिधी

गुरुवारी सकाळपासूनच थैमान घालणाऱ्या पावसामुळे जगबुडीसह नारंगी नद्या दुथड्या भरून वाहत होत्या. सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जगबुडीचे पाणी मटण मच्छी मार्केटमध्ये घुसले. बाजारपेठेत पुराचे पाणी घुसण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांच्या उरात धडकीच भरली. रात्री उशिरापर्यंत पावसाचे थैमान सुरू होते. जगबुडी नदीकाठच्या रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर प्रशासनानेही व्यापाऱ्यांसह नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
Jagbudi waterMutton Machhi market
Next Article