For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीचे गालबोट

06:03 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीचे गालबोट
Advertisement

 एकाचा मृत्यू : 50 हून अधिक भाविक जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ पुरी

जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याने सोहळ्याला गालबोट लागले. भगवान बलभद्रचा रथ ओढत असताना एका भक्ताचा श्वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भगवान जगन्नाथाचा रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू असताना भाविकांमध्ये घाईगडबड सुरू झाल्याने 300 ते 400 भाविक खाली पडले. यात जखमी भाविकांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 50 हून अधिक भाविकांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे. दरम्यान, इतर जखमी भाविकांवर पुरीच्या मुख्य ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत भाविक ओडिशाच्या बाहेरील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, मृत भाविकाची ओळख पटलेली नाही.

Advertisement

आरोग्यमंत्र्यांची रुग्णालयात धाव

पुरी रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा मुख्य रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. आरोग्यमंत्र्यांनी जखमींशीही चर्चा केली. तसेच कोणत्या परिस्थितीत चेंगराचेंगरी झाली आणि अशी परिस्थिती निर्माण झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Tags :

.