For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगनमोहन यांच्या आईकडून कन्येची पाठराखण

06:09 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगनमोहन यांच्या आईकडून कन्येची पाठराखण
Advertisement

भावाबहिणीचे भांडण : शर्मिला रेड्डी यांना मिळाला मोठा आधार

Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि त्यांची बहिण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शर्मिला रेड्डी यांच्यात कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीवरून वाद सुरू आहेत. याचदरम्यान त्यांच्या आई वायएस विजयम्मा यांनी एक पत्र लिहून शर्मिला यांचे समर्थन केले आहे. ज्याच्यासोबत अन्याय झाला अशा अपत्याच्या बाजूने आवाज उठविणे हे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. शर्मिला ही कौटुंबिक व्यवसायात सामील नव्हती, परंतु जगनमोहन रेड्डीच्या निर्देशावर राजकारणात निस्वार्थ भावनेने काम करत होती असा दावा विजयम्मा यांनी केला आहे.

Advertisement

जगनमोहन सत्तेवर येण्याचे श्रेय शर्मिलालाच जाते. एका आईच्या स्वरुपात सर्व अपत्य माझ्यासाठी समान आहेत. एका अपत्यासोबत अन्याय होताना पाहणे वेदनादायी आहे. एका आईच्या स्वरुपात अन्याय झालेल्या अपत्यासाठी आवाज उठविणे माझे कर्तव्य असल्याचे विजयम्मा यांनी नमूद पेले आहे.

माझे दिवंगत पती राजशेखर रेड्डी आमची मुले आणि मी एक आनंदी परिवार होतो. आमचा परिवार अशा संकटांना का सामोरा जात आहे हे समजण्यास मी असमर्थ आहे. हा प्रकार रोखण्याच्या माझ्या प्रयत्नानंतरही दुर्दैवी घटना माझ्या डोळ्यासमोर घडत आहेत. वायएसआर यांनी हयात असताना काही संपत्ती मुलगी शर्मिला आणि काही पुत्र जगनच्या नावावर केली होती. परंतु हे संपत्तीचे वाटप नव्हते, असा दावा विजयम्मा यांनी केला आहे.

2009 मध्ये रेड्डीचा दुर्घटनेत मृत्यू

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे लोकप्रिय नेते वायएस राजशेखर रेड्डी यांचा 2009 साली एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. मुलांना समान हिस्सा मिळावा अशी वायएसआर यांची इच्छा होती आणि हेच सत्य आहे. जगनने संपत्तीत भर घालण्यासाठी कठोर मेहनत केली, परंतु सर्व संपत्ती परिवाराच्या आहेत असा दावा विजयम्मा यांनी पत्रात केला आहे.

शर्मिला यांच्यावर अन्याय

2009 मध्ये वायएसआर यांच्या दुर्घटनेतील मृत्यूनंतर जगन आणि शर्मिला 2019 पर्यंत एकत्र राहिले. जगन यांनी स्वत:च्या हिस्स्यातील 200 कोटी रुपये शर्मिला यांना सामंजस्य करारानुसार दिले. यानुसार जगन यांना 60 टक्के तर शर्मिला यांना 40 टक्के हिस्सा मिळणार होता. परंतु त्यापूर्वी शर्मिला यांच्याकडे जगन इतकाच हिस्सा होता.  2019 मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर जगनमोहन यांनी संपत्तीच्या वाटपाचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु संपत्तीप्रकरणी शर्मिला यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आल्याचे विजयम्मा यांनी म्हटले आहे. राजशेखर हे जिवंत असते तर संपत्तीचा मुद्दा उपस्थित झाला नसता.  जर ही अराजकता नसती तर मला बोलण्याची गरज भासली नसती. केवळ माझेच शब्द हा वाद थांबवू शकतात असे माझे मानणे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.