For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारिवडेत घरावर झाड कोसळून जाधव कुटुंबियांचे नुकसान

05:51 PM Apr 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कारिवडेत घरावर झाड कोसळून जाधव कुटुंबियांचे नुकसान
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

सह्याद्री पट्ट्यातील कारिवडे ,कलंबिस्त ,शिरशिंगे ,माडखोल, आंबोली ,आधी भागात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ व गारांचा धुवाधार पाऊस झाला . यात ग्रामस्थांचे घरांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे .वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावाला फटका बसला असून जिवितहानी टळली मात्र हजारो रुपयांची हानी झाली आहे. कारिवडे जाधववाडीतील रहिवासी श्री.मधुकर बाबुराव जाधव यांच्या घरावर काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जांभळीचे प्रचंड मोठे झाड कोसळले.नशीब बलवत्तर म्हणून जाधव कुटुंबियांचा जीव वाचला.मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.श्री.मधुकर हे मोलमजुरी करून चरितार्थ चालवित असताना हे नुकसान त्यांना परवडणारे नाही.त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी जाधव यांनी केलेली आहे.कलंबिस्त ,शिरशिंगे , वेर्ले भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे सर्वांची एकच धांदल उडाली .तहसीलदार श्रीधर पाटील यांनी या भागाचा पंचनामा तलाठी यांच्या वतीने केला आहे . या भागात जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे असे सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.