For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सौराष्ट्र रणजी संघात जडेजाचा समावेश

06:38 AM Oct 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
सौराष्ट्र रणजी संघात जडेजाचा समावेश
Advertisement

वृत्तसंस्था, राजकोट

Advertisement

2026-27 च्या रणजी क्रिकेट हंगामातील सलामीच्या सामन्यात भारताचा अनुभवी आणि ज्येष्ठ अष्टपैलू रवींद्र जडेजाचा सौराष्ट्र संघात समावेश करण्यात आला आहे. जयदेव उनादकटकडे सौराष्ट्रचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. सौराष्ट्रने यापूर्वी दोन वेळा रणजी करंडक जिंकला आहे.

या सामन्यासाठी 16 सदस्यांचा सौराष्ट्र रणजी संघ जाहीर करण्यात आला आहे. विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाचा समावेश होता. भारतीय संघाने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिली कसोटी वेलिंग्टनमध्ये 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान तर दुसरी कसोटी ख्राईस्टचर्च येथे 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.

Advertisement

2026-27 च्या 92 व्या रणजी क्रिकेट हंगामाला 11 ऑक्टोबरपासून प्रारंभ होईल. गेल्या वर्षी या स्पर्धेत सौराष्ट्र संघाला प्राथमिक फेरीमध्ये हार पत्करावी लागली होती. यावेळी सदर स्पर्धेत सौराष्ट्रचा इलाईट ब गटात समावेश आहे. या गटामध्ये आंध्र, आसाम, छत्तीसगड, हैदराबाद, कर्नाटक, पंजाब आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. उनादकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाने 2019-20 तसेच 2022-23 साली रणजी करंडक स्पर्धा जिंकली होती. आता सौराष्ट्रचा सलामीचा सामना छत्तीसगडबरोबर राजकोटमध्ये खेळविला जाईल.

सौराष्ट्र संघ : जयदेव उनादकट (कर्णधार), रवींद्र जडेजा, हार्विक देसाई, अर्पित वासवदा, चिराग जानी, प्रेरक मंकड, जय गोहिल, चेतन साकारिया, अंकुर पनवाल, समार गज्जर, पार्थ भूत, विश्वराजसिंग जडेजा, कोटक, निल पांड्या, अर्थ यादव आणि तरंग गोहेल.

Advertisement

.