For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार जॅकलीन

06:16 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार जॅकलीन
Advertisement

नील नितिन मुकेशसोबत झळकणार

Advertisement

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या स्वत:च्या ओटीटी पदार्पणावरून चर्चेत आहे. जॅकलीन एका सीरिजद्वारे स्वत:ची ओळख निर्माण करू इच्छित आहे. या सीरिजचे नाव ‘गोट’ असून या म्युझिकल ड्रामाचे चित्रिकरण जवळपास समाप्त झाले आहे.

जॅकलीनच्या या सीरिजचे पूर्ण नाव ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स’ आहे. यात मुख्य अभिनेता म्हणून नील नितिन मुकेश झळकणार आहे. परंतु जॅकलीनसमोर तो एका आव्हानात्मक भूमिकेत दिसून येणार आहे. जॅकलीन यात एका नृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. तर नील यात संगीत शिक्षकाच्या भूमिकेत आहे. पूर्ण सीरिजमध्ये दोघेही स्वत:च्या कलेवरून परस्परांशी स्पर्धा करताना दिसून येतील. या सीरिजमध्ये अनेक नवे कलाकारही दिसून येणार आहेत.

Advertisement

जॅकलीन ही स्वत: उत्तम नृत्यांगना आहे. तर नीलचे आजोबा आणि पिता हे गायक राहिले आहेत. अभिनेत्याला स्वत:च्या संगीत वारशाला सीरिजमध्ये दर्शविण्याची संधी मिळाली आहे. या सीरिजमध्ये प्रियांक शर्मा, सिद्धार्थ निगम, एलीशा मेयर, सुमेद मुदगालकर, देवंगशी सेन, सांचित कुंडरा, मोहन पांडे इत्यादी कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement
Tags :

.