जाफर जॅक्सनला मिळाला नवा प्रोजेक्ट
अभिनेता जाफर जॅक्सनने स्वत:चे दिवंगत काका पॉपस्टार मायकल जॅक्सन यांची भूमिका त्यांच्या बायोपिकमध्ये साकारली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. अभिनेता लवकरच आता अॅक्शन थ्रिलर ‘सुपरमॅक्स’मध्ये दिसून येणार आहे.
अमेझॉन एमजीएम आणि मिरामॅक्सचा चित्रपट ‘सुपरमॅक्स’मध्ये तो अभिनय करणार आहे. परंतु त्याच्या भूमिकेविषयी माहिती अद्याप चाहत्यांना देण्यात आलेली नाही. चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पहायला मिळणार आहे. याची कहाणी एफबीआय एजंट्स आणि त्यांच्या तपासावर आधारित असेल. हे एजंट्स उच्च सुरक्षा प्राप्त तुरुंगातील हत्येचा तपास करत असतात. यात विल स्मिथ आणि एना सोफिया रॉब महत्त्वाच्या भूमिकेत असतील. चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड ग्रीन करत आहेत.
जाफर जॅक्सनला ‘मायकल’ चित्रपटानंतर जगभरात ओळख प्राप्त झाली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. चित्रपटाचे जागतिक कलेक्शन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक राहिले होते.