अय्यर, हार्दिक यांना स्लो ओव्हर रेटसाठी दंड
वृत्तसंस्था / अहमदाबाद
आयपीएल क्लालिफायर 2 दरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या यांना त्यांच्या संबंधित संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार अय्यरला हंगामातील दुसरा गुन्हा म्हणून 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर एमआयच्या पंड्याला तिसऱ्यांदा गुन्हेगार म्हणून 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ओव्हररेटच्या गुन्ह्यांशी संबंधित आयपीएलच्या आचारसंहितेनुसार हा त्यांच्या संघाचा हंगामातील दुसरा गुन्हा असल्याने अय्यरला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयपीएलच्या निवेदनात म्हटले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दीक पंड्यालाही स्लो ओव्हररेट राखल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार हा त्यांच्या संघाचा हंगामातील तिसरा गुन्हा असल्याने पंड्याला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयपीएलने म्हटले आहे. पीबीकेएस प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित सदस्यांना प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 25 टक्के, जे कमी असेल ते दंड ठोठावण्यात आला. तर एमआयच्या खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड करण्यात आला. अय्यरने नाबाद 87 धावांची खेळी करत पंजाब किंग्जला क्लालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सवर पाच विकेटने विजय मिळवून दिला आणि 2014 नंतर ते प्रथमच आयपीएल फायनलमध्ये पोहोचले आहेत.