For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इवाश्काचा गोमेझला धक्का

06:02 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
इवाश्काचा गोमेझला धक्का
Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

Advertisement

बेलारूसचा माजी टॉप-50 स्टार इलिया इवाश्काने सोमवारी महा ओपन एटीपी चॅलेंजर 75 मध्ये तीन सेटच्या रोमांचक सामन्यात अव्वल मानांकित फेडेरिको अॅगस्टिन गोमेझचा पराभव करून मोठा धक्का दिला.

32 वर्षीय इवाश्काने 2 तास 25 मिनिटांत गोमेझवर 6-1, 1-6, 7-6 (9-7) असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. जपानच्या युता शिमिझूने उत्कृष्ट कामगिरी करत इटलीच्या लोरेन्झो कार्बोनीचा 6-4, 6-4 असा पराभव केला. ब्रिटनच्या अॅलिस्टर ग्रेने पोलंडच्या डॅनियल मिचाल्स्कीचा 6-3, 3-6, 6-3  तर क्रोएशियाच्या दुजे अजदुकोविचनेही कोरियाच्या शिन सॅन-हुईचा 6-2, 6-4, जपानच्या ताकुया कुमासाकाने एस.डी. प्रज्वल देवचा 6-4, 6-2 असा पराभव केला. चायनीज तैपेईच्या तुंग-लिन वूने अंतिम पात्रता फेरीत दिग्विजय प्रताप सिंगचा 7-5, 6-4 असा पराभव केला. जपानचे मॅक्स कासनिकोव्स्की, मासामिची इमामुरा, युसुके ताकाहाशी आणि मलेशियन मित्सुकी वेई कांग लिओंग हे इतर पात्रता फेरीतील खेळाडू होते.

Advertisement

निकाल: मुख्य ड्रॉ (पहिली फेरी): एकेरी - इल्या इवाश्का बीटी फेडेरिको अगस्टिन गोमेझ (आर्ग)6-1, 1-6, 7-6(7); युटा शिमिझू (जेपीएन) बीटी लोरेन्झो कार्बोनी (इटा) 6-4, 6-4; लिस्टर ग्रे (जीबीआर) बीटी डॅनियल मिकाल्स्की (पोल) 6-3, 3-6, 6-3; दुजे अजदुकोविक (क्रो) बीटी सान्हुई शिन (कोर) 6-2, 6-4.

अंतिम पात्रता फेरी : ताकुया कुमासाका (जेपीएन) बीटी एस डी प्रज्वल देव (इंडिया) 6-4, 6-2; तुंग-लिन वू (टीपीई) बीटी दिग्विजयप्रताप सिंग (इंडिया) 7-5, 6-4; मॅक्स कास्निकोव्स्की (पोल) बीटी एगोर अगाफोनोव 6-4, 6-4; मासामिची इमामुरा (जपान) डेव्हिड जॉर्डा सँचिस 6-4, 6-3; मित्सुकी वेई कांग लिओंग (मास) बीटी त्सुंग-हाओ हुआंग (टीपीई) 6-2, 6-3; युसुके ताकाहाशी (जेपीएन) बीटी अलेक्झांडर बिंदा (इटा) 6-4, 6-3.

Advertisement
Tags :

.