हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार यूलिया वंतूर
सलमान खानची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा
सलमान खानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यूलिया लवकरच ’ईकोज ऑफ अस’मध्ये दिसुन येणार आहे. यासंबंधीची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली आहे. ईकोज ऑफ अस हा एक इंग्रजी भाषेतील चित्रपट असून यात यूलिया वंतूरसोबत पूजा बत्रा, दीपक तिजोरी आणि स्पॅनिश अभिनेत्री एलेसेंड्रा व्हेलन मॅरिज दिसून येणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन करणार असून त्यांनी लव यू सोनियो चित्रपटाद्वारे स्वत:च्या दिग्दर्शकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. नव्या इंग्रजी चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले असून यात यूलिया महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती पूजा बत्राच्या एलायन्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनर अंतर्गत केली जाणार आहे. यूलिया एक रोमानियन अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे. यूलियाने रोमानियामध्ये मॉडेलिंग आणि टीव्ही अँकर म्हणून काम केले आहे. भारतात तिने संगीत क्षेत्रात काम केले असून अनेक गाण्यांना स्वत:चा आवाज दिला आहे. यूलियाला सर्वाधिक सलमान खानसोबतच्या कथित संबंधांवरून ओळखले जाते. यूलियाने सलमानच्या चित्रपटातील एका गाण्यालाही आवाज दिला आहे.