For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एका लाखासाठी लाखमोलाची नोकरी गमावण्याची पाळी!

11:46 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
एका लाखासाठी लाखमोलाची नोकरी गमावण्याची पाळी
Advertisement

माहिती तंत्रज्ञान खात्यातील उपसंचालक निलंबित : सिद्धार्थ बोरकरने मागितली होती एका लाखाची लाच

Advertisement

पणजी : कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरतीसाठी एका तऊणाकडे एक लाख ऊपयांची लाच  मागण्याची जबर ‘किंमत’ माहिती तंत्रज्ञान खात्यातील अधिकाऱ्याला मोजावी लागली आहे. सध्या त्याला घरची वाट दाखविण्यात आली आहे. लाच मागणारा अधिकारी ‘आयटी’ क्षेत्राशी संबंधित असला तरी त्याला पद्धतशीरपणे आपल्या जाळ्यात अडकवणारा उमेदवार त्याच्यासाठी ‘एआय’ ठरला आहे. सिद्धार्थ बोरकर असे सदर निलंबित अधिकाऱ्याचे नाव असून तो उपसंचालकपदी कार्यरत होता. माहिती तंत्रज्ञान खात्याशी संबंधित इन्फोटेक महामंडळात कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरती करण्यात येणार होती. त्यासाठी अनेक इच्छुक तयार होते. नोकरी काही कायमस्वऊपी नव्हती. कंत्राटी पद्धतीने भरती म्हटल्यावर जास्तीत जास्त 15 हजार ऊपयांपर्यंत पगाराची ही नोकरी होती. तरीही अशा नोकरीसाठीसुद्धा लाच मागण्याचे धाडस इन्फोटेक महामंडळातील अधिकारी करू शकतात, यावरून भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर ऊजलेली आहेत याची झलक मंगळवारी संपूर्ण गोमंतकीयांनी पाहिली. अशा कवडीमोल पगाराच्या नोकरीसाठी आलेल्या उमेदवाराने मात्र सदर उच्चपदस्थ अधिकाऱ्याला जीवनाची अद्दल घडवत स्वत:ची लाख मोलाची नोकरी गामावण्याची पाळी त्याच्यावर आणली. अशाप्रकारे त्याला घरची वाट दाखविण्याची किमया साधली.

नोकरी मागण्यासाठी आलेल्या सदर उमेदवाराने त्या अधिकाऱ्याला चर्चेत गुंतवून ठेवत त्यादरम्यान झालेल्या चर्चेचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले. रेकॉडिंग नंतर समाजमाध्यमांवरून व्हायरल केले. त्यातून राज्यभरात एकच खळबळ माजली. सदर प्रकाराची नंतर आयटी मंत्रालयाने गंभीर दखल घेताना क्षणाचाही विलंब न लावता त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची प्रक्रिया आरंभ केली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी त्याच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. ‘न खाऊंगा, ना खाने दुंगा’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत असतात. तरीही सरकारातील अनेक अधिकारी पंतप्रधानांना न जुमानता मोठ्या प्रमाणात लाचखोरी करत असतात. परंतु पैशांची चटक कधीकधी कितीसुद्धा महाग पडते याचे ज्वलंत उदाहरण या प्रकरणातून समोर आले आहे. दरम्यान, सदर अधिकाऱ्याने यापूर्वीही अशाच प्रकारे अन्य कुणा उमेदवाराकडून लाच घेतली होती का? याचीही चौकशी सध्या आरंभ करण्यात आली आहे. तसे झाल्यास सदर अधिकारी अधिकच गोत्यात येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.